AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्यासाठी वरदान आहेत शेवग्याच्या शेंगा, भाजीमध्ये दडलेत ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण आहारात अनेक पौष्टिक पदार्थांचा समावेश करत असतो. तसेच काही सुपरफुड देखील आहारामध्ये घेत असतो. शेवग्याच्या शेंगा देखील एक प्रकारचं सुपरफूडच आहे.

आरोग्यासाठी वरदान आहेत शेवग्याच्या शेंगा, भाजीमध्ये दडलेत 'हे' आश्चर्यकारक फायदे
| Edited By: | Updated on: Mar 04, 2025 | 9:51 PM
Share

निरोगी आरोग्यासाठी आपल्या आहारात भाज्यांचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. भाज्यांचे सेवन केल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. यामध्ये रोजच्या आहारात आपण बटाटे, कोब‍ी, फलावर, कारले, वांगी, वटाणे यासारख्या अनेक भाज्या असतात त्यांचा समावेश करत असतो आणि लोकं दररोज या भाज्यांचे सेवन करतात. परंतु काही भाज्या अशा आहेत जे अनेकजण खूप कमी खातात किंवा त्यांना खायला आवडत नाही. अशीच एक भाजी म्हणजे शेवग्याची शेंग. ही भाजी अनेकांना अजिबात आवडत नाही तर काही लोक खुप कमी खातात.

तर शेवग्याच्या शेंगाची भाजी आपल्या शरीरासाठी खुप लाभदायक आहे. तसेच या शेवग्याच्या पानाची व फुलांची भाजी देखील शरीरासाठी खूप उपयुक्त ठरते. तसेच शेवग्याची शेंगा सर्व पोषक तत्वांनी समृद्ध आहे. कारण शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. अशातच तुम्ही जर शेवग्याच्या शेंगांची भाजी तुमच्या आहारात समावेश केल्याने तुम्हाला आरोग्यासाठी कसे वरदान ठरेल ते जाणून घ्या.

शेवग्याच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे

केस निरोगी ठेवते – लोह आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले शेवग्याची शेंग आपल्या शरीरातील कोलेजन उत्पादन वाढवते. तसेच टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुधारते, ज्यामुळे केस गळणे कमी होऊ शकते.

त्वचा चमकदार ठेवा – शेवग्याची भाजी खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते. कारण शेवग्याच्या शेंगामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, जे फ्री रॅडिकल्सशी लढतात. अशाप्रकारे तुमची त्वचेच्या समस्या निर्माण होत नाही. त्यामुळे त्वचा सुरक्षित राहण्यासोबतच दीर्घकाळ तरुण आणि चमकदार राहते.

स्तनपानात मदत – तुम्ही जर तुमच्या बाळाला स्तनपान करत असाल तर शेवग्याची भाजी खूप लाभदायक आहे. कारण शेवग्याची भाजी खाल्ल्याने दुधाचे प्रमाण वाढते. हे एक नैसर्गिक गॅलेक्टॅगॉग आहे. त्यामुळे या भाजीच्या सेवनाने प्रसूती झालेल्या स्त्रीयांच्या याचे भरपूर पोषण मिळते.

मूड बूस्टर – शेवग्याच्या शेंगामध्ये मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्वे असल्याने याच्या सेवनाने तुमच्या शरीरातील ताण कमी करण्यास, झोप सुधारण्यास आणि नैसर्गिकरित्या तुमचा मूड सुधारण्यास मदत करतात. हे सर्व पोषक घटक शेवग्याच्या शेंगामध्ये आढळतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला वाईट वाटत असेल, चिडचिड होत असेल, चिंता वाटत असेल, ताण येत असेल तर तुम्ही ही भाजी जरूर खावी.

हार्मोनल बॅलन्स – शेवग्याच्या भाजीमध्ये भरपूर फायटोन्यूट्रिएंट्स असतात. हे इस्ट्रोजेन चयापचय आणि एकूण आरोग्यास चांगले राहण्यासाठी सपोर्ट करते.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.