मुलांची जंकफूड खाण्याची सवय मोडण्यासाठी ‘या’ सोप्या मार्गाचा करा अवलंब
आजकाल प्रत्येक लहान मुलं हे बाहेरचे जंकफूड खातात. त्यात हे पदार्थ खाणे पसंत देखील करतात. अशातच जर तुमच्या मुलालाही जंक फूड खाण्याची सवय असेल तर भविष्यात मुलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ही सवय सोडून देणे खूप महत्वाचे आहे. तर आजच्या या लेखात आपण या काही खास टिप्सच्या मदतीने तुम्ही मुलांना घरी बनवलेले पदार्थ खाण्याची सवय लावू शकता. चला तर मग जाणून घेऊयात...

आजकाल बदलत्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे अनेकजण बाहेरील पदार्थांचे सर्वाधिकरित्या सेवन करत असतात. अशातच लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच जंकफूड खाण्याची चटक लागलेली आहे. कारण हे जंकफूड चवीला एकदम भन्नाट असतात आणि ते अगदी बजेट फ्रेंडली असतात. अशातच बऱ्याचपैकी लोकांनी बाहेरचे खाल्ल्याने आरोग्याला होणारे नुकसान लक्षात घेऊन मर्यादित प्रमाणात जंक फूड खातात. पण जर आपण मुलांबद्दल बोललो तर त्यांना ते समजावून सांगणे कठीण आहे. जर त्यांना बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय लागली तर ते दररोज बाजारातून पिझ्झा, बर्गर, समोसे, चिप्स आणि इतर अनेक पदार्थ खाण्याचा आग्रह धरतात.
पण बाहेरचे पदार्थ जास्त किंवा दररोज खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हळूहळू नुकसान होऊ शकते. जंक फूडमध्ये कॅलरीज, फॅट आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरात अतिरिक्त फॅट जमा होऊ शकते, ज्यामुळे लठ्ठपणा समस्या निर्माण होऊ शकतो. याशिवाय, संसर्ग आणि अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका वाढतो. म्हणून, मुलांना नेहमीच घरगुती निरोगी पदार्थ खायला द्यावे. अशातच मुलांना कधीतरी क्वचित बाहेरचे पदार्थ खायला देणे योग्य ठरेल. अशातच जर तुमची मूलं बाहेरचे फास्टफूड आणि जंक फूड खाण्याचा आग्रह धरत असेल, तर तुम्ही या टिप्सच्या मदतीने त्यांच्या या सवयीपासून दूर ठेऊ शकतात.
घरी जंक फूड कमी करा
सर्वप्रथम पालकांनी बाहेरचे जंक फूड घरात आणणे कमी करावे, कारण मुले मोठ्यांच्या सवयींचे पालन करतात. जर तुम्हीही बाहेरचे जंक फूड खात असाल तर मुलांनाही तीच सवय लागते, म्हणून, मुलांसमोर जंक फूड खाणे टाळा.
निरोगी पदार्थ खा
मुलांना नेहमी हंगामी भाज्या, फळे, नट्स आणि घरगुती पदार्थ खायला देणे. यामुळे त्यांना घरातील पौष्टिक पदार्थ खाण्याची सवय होईल. तसेच मीठ, मिरची आणि इतर मसाले मर्यादित प्रमाणात वापरा. यामुळे मुलाला सुरुवातीपासूनच कमी मसालेदार आणि तेलकट अन्न खाण्याची सवय होईल
खाणे मजेदार बनवा
बाहेरचे पदार्थ जास्त तेलकट आणि मसालेदार किंवा चविष्ट असते त्यामुळे मुलांना हे जंकफूड खायला जास्त आवडते. हेच लक्षात घेऊन तुम्ही ही घरी जेवण बनवताना वेगवेगळ्या प्रकारे निरोगी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करा. जर मुलाला स्प्राउट्स खायला आवडत नसेल, तर तुम्ही त्याचा बेसनचा चिल्ला बनवू शकता आणि मुलांना देऊ शकता. मुलांना अन्नाशी संबंधित काही गोष्टी सांगा. जर त्यांना भाज्या खायला आवडत नसतील, तर ते चविष्ट बनवून त्याला खायला देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काही भाज्या या सँडविचमध्ये भरून खायला देऊ शकता.
घरी बनवा
जर मुलाला पिझ्झा आणि बर्गर सारख्या गोष्टी खायला आवडत असतील तर तुम्ही हे सर्व पदार्थ घरी हेल्दी भाज्यांचा पदार्थांचा वापर करून बनवू शकता. पिझ्झा, सँडविच आणि बर्गरमध्ये हेल्दी भाज्या मिक्स करून मुलांना द्या.
काही दिवसातून चीट डे शेड्यूल करा
यासोबतच, मुलांसाठी एक चीट डे निश्चित करा. त्यांना दर 10 ते 15 दिवसांनी बाहेरचे अन्न खायला द्या. त्यात मुलांना खायला देताना काही पदार्थांच्या गुणवत्तेची काळजी घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
