Foods To Boost Your Mood : खराब मूड सुधारायचा असेल तर दररोज खा हे पदार्थ

मूड स्विंगची, वारंवार मूड बदलण्याची समस्या अतिशय त्रासदायक असते. तुम्हालाही मूड स्विंगचा त्रास होत असेल तर काही पदार्थ खाऊन बघा, तुमचा मूड नक्की सुधारेल.

Foods To Boost Your Mood : खराब मूड सुधारायचा असेल तर दररोज खा हे पदार्थ
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 7:41 AM

नवी दिल्ली : आधुनिक काळात लोकांना धकाधकीचे जीवन जगण्याची सवय झाली आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्याच वेळी, मूड स्विंगमुळे, व्यक्तीला तणाव देखील होतो. यासाठी मूड चांगला असणं खूप गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीच्या मूडमध्ये अचानक मोठा बदल (mood change) होत असेल तर त्याला मूड स्विंग (mood swing) म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, मूड स्विंगमुळे, एखाद्या व्यक्तीच्या मूडमध्ये अचानक बदल होऊ शकतो. अशी व्यक्ती एका क्षणी आनंदी असेल तर दुसऱ्या क्षणी अचानक दुःखी होते. तुम्हालाही मूड स्विंगचा त्रास होत असेल आणि बिघडलेला मूड सुधारायचा किंवा ठीक करायचा असेल तर काही पदार्थांचे सेवन करणे (food for good mood) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

ते पदार्थ कोणते हेही जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

केळं खावं

तुम्हाला तुमचा मूड सुधारायचा असेल तर रोज केळी खावीत. केळीमध्ये अमिनो ॲसिड आढळते. हे आवश्यक पोषक सेरोटोनिन सोडण्यात मदत करते. यामुळे मूड सुधारतो. यासाठी रोज केळ्याचे सेवन करावे.

बदाम ठरतात उपयुक्त

बदाम आपल्या आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. त्याच्या वापराने मेंदू तीक्ष्ण होतो, तसेच स्मरणशक्ती वाढते. यासोबतच बदाम खाल्ल्याने मूडही चांगला राहतो. यासाठी रोज बदामाचे सेवन करावे. यामध्ये मॅग्नेशिअम आढळते, जे शरीरात आनंदी हार्मोन वाढवते.

दूध प्या

आरोग्य तज्ज्ञ निरोगी राहण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला देतात. यामध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच, व्हिटॅमिन बी 12 आणि ट्रिप्टोफॅन दुधामध्ये आढळतात, जे मूड वाढवण्यास मदत करतात. यासाठी रोज दूध प्यावे. ते (दूध) आणखी चविष्ट व्हावे यासाठी तुम्ही दुधात मध आणि गूळ मिसळू शकता.

अननस ठरतो फायदेशीर

अननसात दाहक-विरोधी आणि ट्रिप्टोफॅन गुणधर्म असतात, जे मूड वाढवण्यास मदत करतात. तुमचा मूड गेला असेल व तो सुधारायचा असेल तर अननस नक्की खा.

सोया प्रॉडक्ट्स

जर तुम्हाला चिंता आणि तणाव दूर करायचा असेल तर तुम्ही सोया प्रॉडक्ट्सचे सेवन करू शकता. यामध्ये ट्रायप्टोफॅन मुबलक प्रमाणात आढळते, जे मूड सुधारण्यास मदत करते.

अंडी खावीत

मूड ठीक करण्यासाठी अंडी खाऊ शकतात. त्यात कोलीन आढळते. यामुळे मूड सुधारतो. सोप्या शब्दात सांगायचे तर अंडी खाल्ल्याने मूड चांगला राहतो.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.