आरोग्य आणि चेहऱ्याच्या समस्येवर गुणकारी चारोळी, वाचा कसं ते…!

आरोग्य आणि चेहऱ्याच्या समस्येवर गुणकारी चारोळी, वाचा कसं ते...!
चारोळी

चारोळीमध्ये विविध पौष्टिक घटक आढळतात. खीर, शिरा आणि बऱ्याच गोड पदार्थांची चव वाढवण्याचे काम चारोळी करते.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 27, 2021 | 10:16 AM

मुंबई : चारोळीमध्ये विविध पौष्टिक घटक आढळतात. खीर, शिरा आणि बऱ्याच गोड पदार्थांची चव वाढवण्याचे काम चारोळी करते. चारोळीमध्ये प्रथिने, जीवनसत्व सी आणि व्हिटॅमिन बीचा चांगला स्रोत आहे. आरोग्यापासून ते त्वचेपर्यंतच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी चारोळी अत्यंत फायदेशीर आहे. चारोळी आपल्या आरोग्यासाठी नेमकी कशी फायदेशीर आहे. हे आज आपण बघणार आहोत. (Eating cuddapah almond is beneficial for health)

1. जर आपल्याला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर चारोळी, बदाम, खजूर, काकडी आणि तीळ समान प्रमाणात बारीक करून घ्या व एक चमचा दूध किंवा पाण्यामध्ये मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा आणि खा. यामुळे डोकेदुखीची समस्या दूर होण्यास मदत होईल.

2. ज्याचे शरीर खूप अशक्त आहे, त्वरीत थकवा येतो. त्यांनी 5-10 ग्रॅम चारोळी बारीक करून त्यात साखर मिसळावी आणि ते दुधात मिक्स करून प्यावे. यामुळे अशक्तपणा दूर होतो.

3. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल आणि वारंवार सर्दी, खोकला येत असेल तर 5-१० ग्रॅम चारोळी तूपात भाजून घ्या. ते 200 मिली दुधात घाला आणि उकळवा. यानंतर 500 मिलीग्राम वेलची पूड आणि साखर मिसळून कोमट प्या. यामुळे सर्दी, खोकला बरा होतो.

4. जर उन्हाळ्यात नाकातून रक्तस्त्राव होण्याची समस्या असेल तर दररोज एक ग्लास दुधात एक चमचा चारोळी मिक्स करा. नंतर थंड झाल्यावर हे दूध प्या. यामुळे नाकातून रक्तस्त्राव होण्याची समस्या दूर होईल.

5 जर आपल्याला दररोज पौष्टिक अन्न खाणे शक्य नसेल तर आपण दररोज चारोळी आहारात घेतली पाहिजे. यामुळे, आपल्या शरीरातील प्रथिन्याची कमतरता पूर्ण होते, तसेच इतर पोषक घटक देखील मिळतात.

6. मुरुमांचा त्रास असल्यास चारोळीमध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि मुरुमांवर लावा. आपण हा पॅक चेहऱ्याला आठवड्यातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास नक्की मदत मिळेल.

7. आपल्या शरीराला सारखी खाज सुटत असेल तर आपण खोबरेल तेलामध्ये चारोळी बारीक करून मिक्स करा. जेंव्हा अंगाला खाज सुटल्यासारखी वाटते. त्यावेळी हे तेल अंगाला लावा.

8. जर आपल्या त्वचेवर काळपटपणा आला असेल तर आपण चारोळीची बारीक पेस्ट करून त्यामध्ये दूध मिसळावे. हा फेसपॅक आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळपटपणा निघून जाण्यास मदत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Eating cuddapah almond is beneficial for health)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें