Eating Habits | वेळेआधीच तुम्हाला ‘म्हातारे’ करतील ‘हे’ पदार्थ, तुम्हीही खात असाल तर नक्की विचार करा!

आपल्या खाण्यापिण्यांच्या सवयींचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर आणि आपल्या आरोग्यावरही दिसून येत असतो. आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, डार्क सर्कल्स आणि बारीक रेषा दिसू लागतात.

Eating Habits | वेळेआधीच तुम्हाला ‘म्हातारे’ करतील ‘हे’ पदार्थ, तुम्हीही खात असाल तर नक्की विचार करा!
खाण्याच्या सवयी
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 7:56 AM

मुंबई : आपल्या खाण्यापिण्यांच्या सवयींचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर आणि आपल्या आरोग्यावरही दिसून येत असतो. आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, डार्क सर्कल्स आणि बारीक रेषा दिसू लागतात. ज्यामुळे लोक आपण म्हातारे झालो, असे विनोदपूर्वक म्हणू लागतात. तथापि, म्हातारे होणे हे काही लज्जास्पद नाही, वयाच्या एका टप्प्यानंतर प्रत्येकाला वृद्धत्वाला सामोरे जावेच लागते. पण, जर वय होण्याच्या आधीच तुम्ही म्हातारे दिसू लागलात, तर ही एक समस्या असू शकते (Eating Habits Avoid these foods if you want to stay young always).

वाढत्या वयानुसार वृद्धत्व सामान्य आहे, परंतु अवेळी खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे वृद्धत्वाची लक्षणे वेळेपूर्वी दिसू लागतात. चला तर, आपण ज्या गोष्टी सध्या वापरत आहोत त्याबद्दल जाणून घेऊया, ज्याचा वापर टाळून आपण वेळेआधीच वृद्ध होण्याची समस्या टाळून, निरोगी राहू शकाल..

सोडा आणि एनर्जी ड्रिंक

सोडा आणि एनर्जी ड्रिंक सतत पिण्याने आपल्या शरीराच्या पेशींचे वय वाढते. या पेयांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे शरीरात कॅलरी वाढतात. या व्यतिरिक्त या पेयांचे सेवन केल्यास वजन, स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंश या आजारांचा धोका देखील वाढतो. प्रमाणापेक्षा जास्त सोडा पाणी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

मसालेदार अन्न

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मसालेदार अन्न आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. जास्त मसालेदार अन्न खाल्यामुळे रक्ताच्या नसांमध्ये सूज येते. याशिवाय चेहऱ्यावर मुरुम दिसू लागतात आणि त्वचा वृद्ध दिसू लागते. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, आहारात कमीतकमी मसाल्यांचा वापर करावा.

मिठाईचे सेवन

प्रत्येकाला मिठाई खायला आवडतात. परंतु, जास्त प्रमाणात साखर घेतल्यामुळे चेहऱ्यावर डार्क सर्कल आणि सुरकुत्या इत्यादींचा त्रास वाढतो. साखरेमध्ये असलेले घटक त्वचेतील कोलेजन आणि इलेस्टिनचे कारण बनतात, ज्यामुळे वृद्धत्वाची समस्या उद्भवते (Eating Habits Avoid these foods if you want to stay young always).

फ्रोझन फूड

फ्रोझन फूडमध्ये भरपूर सोडियम असते, जे मूत्रपिंडासाठी हानिकारक असते. फ्रोझन फूड ताजे ठेवण्यासाठी स्टार्चचा वापर केला जातो. आहारात फ्रोझन फूडचा जास्त प्रमाणात वापर केल्याने मधुमेह आणि हृदयविकारांचा धोका वाढतो. याशिवाय वजनही वाढते.

जास्त मद्यपान

जास्त मद्यपान केल्याने आपल्याला डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. यामुळे, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. शरीरात पाण्याच्या अभावामुळे आपल्या त्वचेवर परिणाम होतो. ज्यामुळे चेहरा कोरडा आणि निर्जीव दिसू लागतो.

मार्जरीन

मार्जरीन बनावट बटरमधील ट्रान्स फॅट आहे, ज्यामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते आणि खराब कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम सुरु होते. मार्जरीनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात सूज येते. यामुळे हृदय व स्ट्रोकचा धोका वाढतो. यामुळे तुमचे शरीर अकाली वृद्ध दिसू लागते.

(टीप : कोणत्याही प्रकारच्या उपचारांपूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Eating Habits Avoid these foods if you want to stay young always)

हेही वाचा :

No Smoking Day 2021 | शरीरासाठी विषासमान ‘धुम्रपान’, सिगारेटची सवय सोडायचीय तर ‘या’ टिप्स ट्राय करा!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.