गूळ खाणे आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर, मिळेल नैसर्गिक चमक!

गुळात नैसर्गिक गोडवा असतो जो खायला चविष्ट असण्यासोबतच शरिरासाठी फायद्याचंही असतं.

गूळ खाणे आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर, मिळेल नैसर्गिक चमक!
गुळ
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 10:55 AM

मुंबई : गुळात नैसर्गिक गोडवा असतो जो खायला चविष्ट असण्यासोबतच शरिरासाठी फायद्याचंही असतं. गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. (Eating jaggery is beneficial for the skin)

गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. गूळ आपल्या आरोग्यासाठी जसा चांगला असतो तसाच आपल्या त्वचेसाठी देखील गूळ महत्वाचा आहे. जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. चला तर मग जाणून घेऊयात गूळ खाण्याचे फायदे….

-गुळामध्ये व्हिटॅमिन्स, लोह, पोटॅशियम, फॉलेट, झिंक आणि सोडिअम यासारख्या पोषण तत्त्वांचा समावेश आहे. ही सर्व पोषण तत्त्व निरोगी आणि नितळ त्वचेसाठी आवश्यक असतात.

-शारीरिक किंवा मानसिक थकव्यामुळे चेहरा निस्तेज वाटत असल्यास थोड्या प्रमाणात गुळाचे सेवन करा. यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि चेहऱ्यावरील थकवा सहजरित्या दूर होण्यास मदत मिळते.

-गुळामध्ये लोह आणि फॉलेट यासारख्या पोषण तत्त्वांचा समावेश आहे. हे घटक शरीरामध्ये पोहोचल्यानंतर त्वचेच्या प्रत्येक पेशींमधील रक्तप्रवाह सुरळीतपणे सुरू ठेवण्याचे कार्य करतात.

-गुळात सेलेनिअम आणि झिंक यांसारखे अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. हे शरिराला फ्री रेडिकल्स आणि संसर्गापासून बाचाव करतात. त्यामुळे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात गुळाचं सेवन केलं जातं.

-हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे त्वचा निर्जीव आणि निस्तेज होते. नियमित योग्य प्रमाणात गुळाचे सेवन केल्यास शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघण्यास मदत मिळेल.

-गुळाच्या सेवनामुळे त्वचा सैल पडत नाही. तसंच त्वचेवर सुरकुत्या, पिगमेंटेशन, फाइन लाइन्स इत्यादी समस्या उद्भवत नाहीत.

-रक्तदाब नियंत्रित करण्यात गुळाची भूमिका महत्त्वाची ठरते. विशेषत: उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

-गूळ खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. गूळ हा पोटॅशिअमचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे इलेक्ट्रोलाईट्सला नियंत्रित ठेवण्यास मदत करते तसेच, मेटाबॉलिजम वाढवण्यातही मदत करते. तसेच, स्नायुंना बळकटी देण्याचं कामही करते.

(डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a

— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021

(Eating jaggery is beneficial for the skin)

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.