AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कढईपासून ते तव्यापर्यंत तेलकटपणा आणि काळपटपणा होईल चुटकीसरशी स्वच्छ, फक्‍त ‘या’ ट्रिक्सचा करा अवलंब

स्वयंपाक झाल्यावर काही भांडी स्वच्छ करणे हे वेळखाऊ काम असते. विशेषतः तेलकट आणि काळ्या पडलेल्या तवा आणि कढई. पण आजच्या लेखात आपण कमी वेळेत अगदी झटपट पद्धतीने स्‍वच्छ करण्याच्या सोप्या ट्रिक्स जाणून घेऊयात.

कढईपासून ते तव्यापर्यंत तेलकटपणा आणि काळपटपणा होईल चुटकीसरशी स्वच्छ, फक्‍त 'या' ट्रिक्सचा करा अवलंब
kadhai
| Edited By: | Updated on: Apr 20, 2026 | 11:32 PM
Share

स्वयंपाकघरात जेवण बनवताना कढई आणि तव्याचा वापर हा हमखास केला जातोच. भाजी असो किंवा तळण्याचा एखादा पदार्थ कढईशिवाय जेवण तयार होणार नाही. बऱ्याचदा रोजच्या वापरातल्या कढई व तवे व्यवस्थित घासले जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर तेलाचा थर साचत राहतो आणि काळांतराने कढई तवे हे काळपट आणि चिकट दिसतात. त्यानंतर तोच तेलकट आणि काळपटपणा काढण्यासाठी तासंतास ते स्वच्छ करण्यासाठी वेळ लागतो. तर तुम्हालाही या समस्यांचा सामना करावा लागतोय का? तर आता चिंता सोडा कारण आजच्या लेखात आपण काही सोप्या ट्रिक्सबद्दल जाणून घेणार आहोत जे कढई असो वा तवा चिवट तेलकटपणा किंवा काळी पडलेली कढई कमीत कमी वेळात आणि झटपट पद्धतीने स्वच्छ करता येईल

या ट्रिक्सच्या मदतीने कढईचा चिवट तेलकटपणा साफ होईल

कढई असो वा स्वयंपाकघरातील इतर कोणतेही भांडे जर त्यावर तेलकटपणा साचला असेल, तर 2 चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्याच्या दुप्पट प्रमाणात म्हणजेच 4 चमचे व्हिनेगर घ्या आणि पेस्ट तयार करा. हे पेस्ट तेलकट चिकट झालेल्या भांड्यांना वर चांगल लावून घ्या आणि काही मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर, डिटर्जंट किंवा डिशवॉशिंग लिक्विडच्या मदतीने स्पंजने घासून स्वच्छ करा.

दुसरी पद्धत म्हणजे स्टोव्हवर एक काळ पडलेलं पातेलं किंवा कढई गरम करणे. त्यात खाण्याचा सोडा, मीठ आणि लिंबाचा रस टाका. थोडे व्हिनेगर सुद्धा टाका जळालेला किंवा काळा पडलेला भाग झाकला जाईल इतके पाणी त्यामध्ये टाका. आता त्याला उकळी येऊ द्या. मग, पातेले स्वच्छ करण्यासाठी राखेने घासून स्वच्छ करा. त्यांनतर तुमच भांड चमकू लागेल. मात्र या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो.

तवा स्वच्छ करण्याची सोपी घरगुती पद्धत

पोळ्या बनवल्यानंतर अनेकांचा तवा काळा झाले असेल, तर ते स्वच्छ करण्याचा एक सोपा उपाय आहे. यासाठी तुम्हाला तुरटीची गरज लागेल. यासाठी तवा गॅसवर ठेवा. त्यात पाणी टाका. आता, तुरटीचा एक तुकडा घ्या आणि तो तव्यावर हळुवारपणे चोळा. भांडे हळूहळू स्वच्छ होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. गॅस बंद करा आणि हे पाणी एका भांड्यात ओता. त्यानंतर भांड्यावर डिटर्जंट पावडर शिंपडा आणि त्या पाण्याने ते स्वच्छ करा. ते चकचकीत चमकू लागेल.

जर तव्यावर काळा आणि तेलकट जाड थर जमा झाला असेल, तर तो स्टोव्हवर ठेवून त्यातून धूर येईपर्यंत तापवा. यामुळे काजळी सैल होईल. ती एखाद्या धारदार वस्तूने खरवडून काढा. यानंतर ते स्वच्छ करण्यासाठी तुरटीची पद्धत वापरा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल.
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?.
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर.....
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर......
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार.
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....