AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garlic Benefits | केसांच्या वाढीसाठीही उपयुक्त ठरेल ‘लसूण’, ‘या’ प्रकारे करा वापर!

लसूण खाल्ल्याने आपला बर्‍याच आजारांपासून बचाव होतो. हे आपल्या केसांसाठीदेखील खूप फायदेशीर आहे. (Garlic Benefits For hair)

Garlic Benefits | केसांच्या वाढीसाठीही उपयुक्त ठरेल ‘लसूण’, ‘या’ प्रकारे करा वापर!
लसूण
| Updated on: Feb 23, 2021 | 11:06 AM
Share

मुंबई : आपल्या स्वयंपाकघरात अशा बर्‍याच भाज्या आहेत, ज्या आपल्या आरोग्यासाठीही खूप महत्वाच्या आहेत. लसूण त्यापैकीच एक आहे. बहुधा आपण सर्वच भाज्यांमध्ये चवीसाठी लसूण वापरतो. परंतु, हे एक प्रकारचे औषध देखील मानले जाते. कारण, लसूण खाल्ल्याने आपला बर्‍याच आजारांपासून बचाव होतो. हे आपल्या केसांसाठीदेखील खूप फायदेशीर आहे (Garlic Benefits For healthy hair growth).

वास्तविक, लसूणमध्ये अ‍ॅलिसिन नावाचा घटक असतो, जो एक चांगला अँटी-ऑक्सिडंट देखील मानला जातो. याशिवाय कार्ब 21, लोह, सल्फरिक अ‍ॅसिड, प्रथिने आणि जीवनसत्त्वे अ, बी, सी, ई यासह इतर अनेक पोषक घटक देखील असतात, जे आपल्या शरीरास अनेक रोगांपासून वाचवतात.

लसणाच्या वापरामुळे केसांची वाढ, अ‍ॅलोपेशीयावर मात आणि डोक्यातील कोंडा कमी होण्यास मदत होते. आज आम्ही आपल्याला लसणाच्या अशाच काही फायद्यांविषयी सांगणार आहोत…

लसूण केसांची वाढ सुधारते.

आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, लसूण आपल्या केसांची वाढ मोठ्या प्रमाणात सुधारण्यात मदत करते. केसांची वाढ सुधारण्यासाठी आपल्याला लसणाचे तेल बनवणे आवश्यक आहे. तेल तयार करण्यासाठी लसणाच्या दहा पाकळ्या सोलून, सोबत एक कांदा देखील सोलून घ्या. आता दोघांची एकत्र पेस्ट तयार करा. आता कढईत अर्धा कप तेल टाकून ते गरम करा. (तुम्ही ऑलिव्ह, एरंडेल किंवा नारळ तेल आवडीनुसार निवडू शकता) या तेलात लसूण आणि कांद्याची पेस्ट घाला. ही पेस्ट तपकिरी होईपर्यंत व्यवस्थित तळा. यानंतर गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. नंतर हे तेल गाळून घ्या आणि या तेलाने स्काल्पवर मालिश करा. आठवड्यातून तीन वेळा असे केल्याने तुमच्या केसांची वाढ लवकर होते (Garlic Benefits For healthy hair growth).

अ‍ॅलोपेशीयापासून मुक्त मिळते.

अ‍ॅलोपेशीया हा एक प्रकारचा केसांचा संसर्ग आहे. यामध्ये आपले एकाच जागेहून बरेच केस नष्ट होतात आणि लसूण या समस्येवर खूप प्रभावी आहे. दररोज, लसूणचा रस काढा आणि तो रस केस नसलेल्या स्काल्पच्या भागावर लावा. अर्धा तास तो रस केसांमध्ये राहू द्या. त्या नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. 2 ते 3 महिने नियमित याचा वापर करा. याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

कोंड्या समस्या देखील दूर होईल.

आजकाल बऱ्याच लोकांना केसांत कोंडा होण्याची समस्या आहे आणि ही समस्या आता खूप सामान्य झाली आहे. यापासून मुक्त होण्यासाठी आपण लसणाच्या दहा कळ्या व्यवस्थित सोलून घ्या. याच बरोबर दोन इंचाचा आल्याचा तिकडा सोलून घ्या. आता दोन्ही घटकांची एकत्र बारीक पेस्ट करा. त्यानंतर नारळ किंवा ऑलिव्ह तेल गरम करून, त्यात पेस्ट घाला आणि तपकिरी होईस्तोवर तळा. यानंतर ते तेल थंड होईस्तोवर बाजूला ठेवा. थंड झाल्यावर आठवड्यातून तीनदा या तेलाने आपल्या स्काल्पची मालिश करा.

(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Garlic Benefits For healthy hair growth)

हेही वाचा :

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....