Food | औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण ‘केळ्याचे फुल’, वाचा याचे आरोग्यदायी फायदे…

Food | औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण ‘केळ्याचे फुल’, वाचा याचे आरोग्यदायी फायदे...
केळ फुल

केळीच्या फुलांमध्ये फायबर, प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस आणि व्हिटामिन ईसारखी खनिजे आणि जीवनसत्वे आढळतात.

Harshada Bhirvandekar

|

Feb 12, 2021 | 3:52 PM

मुंबई : खनिजांनी भरलेल्या केळीच्या फायद्यांविषयी आपण सगळ्यांनी बरेच काही ऐकले असेल, परंतु आज आम्ही तुम्हाला केळ फुलांच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत. केळीच्या फुलांमध्ये फायबर, प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस आणि व्हिटामिन ईसारखी खनिजे आणि जीवनसत्वे आढळतात. हे फुल कच्चे किंवा शिजवून, तसेच सूप, कोशिंबीर आणि तळून देखील खाल्ले जाऊ शकते. याशिवाय केळीच्या फुलाचा हेअर पॅक किंवा फेस पॅक म्हणूनही वापर करता येते (Health Benefits of Banana Flower).

केळ फुलाचे फायदे :

– केळीच्या फुलामध्ये अॅसिडस्, टॅनिन, फ्लेव्होनॉइड्स आणि इतर अँटीऑक्सिडेंट असतात, जे कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.

– महिलांना बहुतेक वेळेस अशक्तपणा असतो, केळीची फुले लोहाचा चांगला स्रोत मानली जातात. याचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनची खूप वेगाने वाढ होते.

– केळीच्या फुलांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. ज्याद्वारे शरीरातील साखर देखील नियंत्रित केली जाते. अशाप्रकारे, हे फुल मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.

– केळीच्या फुलांमध्ये निराशाविरोधी अर्थात अँटी-डिप्रेशन घटक असतात, जे मानसिक तणावापासून आपले संरक्षण करतात आणि आपला मूड सुधारण्यास मदत करतात.

– मासिक पाळी दरम्यान जास्त वेदना होत असल्यास आणि रक्तस्त्राव जास्त झाला असेल, तर केळीचे फुल दह्या बरोबर घेतल्यास खूप आराम मिळतो (Health Benefits of Banana Flower).

–  जर आपल्याला दीर्घकाळ तरुण दिसायचे असेल, तर आपण केळीचे फुल किसून दररोज फेस क्रिम, मॉइश्चरायझर इत्यादीमध्ये मिसळून वापरू शकता. यामुळे तुमच्या चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होतील.

– केळफुलात डाएटरी फायबर्स आणि व्हिटामिन ई सोबतच अ‍ॅन्टीऑक्सिडंटसदेखील मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे शरीरातील फ्री रॅडीकल्सचा धोका कमी करण्यास मदत होते. परिणामी कॅन्सरचा धोकादेखील मंदावतो.

– केसातील कोंडा केस गलतीस कारणीभूत ठरतो आणि केस निर्जीव देखील होतात. जर तुम्हालाही असा समस्या असतील, तर केळ्याच्या फुलाचा हेअर पॅक बनवून वापर केल्याने या समस्या मुळापासून दूर होतील. याशिवाय केळ्याचा हेअर पॅक केसांची वाढ सुधारतो.

पॅक कसा बनवायचा

याचा हेअर पॅक करण्यासाठी आधी केळीचे फुल पाण्यात उकळवा. यानंतर, उकडलेले फुल पूर्णपणे पिकलेल्या एका केळ्यासह व्यवस्थित मिक्स करून त्याची पेस्ट करा. नंतर त्यात मध आणि दूध मिसळा आणि हेअर पॅक तयार करा. अर्ध्या ते एक तासासाठी केसांवर हा हेअर पॅक लावा, मग केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health Benefits of Banana Flower)

हेही वाचा :

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें