Wrinkles Problem | तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येतायत? मग, ‘हे’ उपाय करून पाहा!

आपले वय वाढत असताना, तोंडावर सुरकुत्यादेखील दिसू लागतात. जेव्हा हे आपल्या लक्षात येते, तेव्हा आपल्या त्वचेतील लवचिकता आणि मॉइश्चरायझर कमी होऊ लागलेले असते. (Home Remedies wrinkles problem)

Wrinkles Problem | तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येतायत? मग, ‘हे’ उपाय करून पाहा!
सुरकुत्यांची समस्या
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 11:11 AM

मुंबई : प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की, आपण वेळेआधी वृद्ध होऊ नये. सगळ्यांनाच आपला चेहरा बहरलेला पहायचा असतो. परंतु, जर आपल्या चेहऱ्यावर अगदी लहान वयातच सुरकुत्या पडल्या, तर कदाचित आपणास सकाळी उठून आरशात आपला चेहरा पाहणे देखील आवडणार नाही. म्हणूनच, आपणही आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडणार नाहीत (Home Remedies on wrinkles problem).

जर, आपल्या चेहऱ्यावर वयाच्या अवघ्या 20 ते 30 वर्षांनंतर सुरकुत्या पडल्या तर आपण देखील अस्वस्थ व्हाल. आजच्या बदलत्या जीवनशैलीत आपल्याला पूर्ण झोप घेता येत नाही आणि धावपळीच्या आयुष्यात आपण व्यवस्थित खाऊ देखील शकत नाही. आपली हीच दिनचर्या जाणवत नसली तरी, आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते..

जर, आपल्याला देखील वेळेआधीच आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत आहेत, तर आपण त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. वेळीच त्यावर उपचार सुरू करावा. यासाठी बाजारात अनेक महागडे उपचार उपलब्ध आहेत, पण यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते.  परंतु, याऐवजी अनेक नैसर्गिक आणि सोपे उपाय उपलब्ध आहेत, जे तुम्ही अगदी सहजपणे ट्राय करू शकता. हे उपाय असे आहेत जे वृद्ध लोक देखील करून पाहू शकतात आणि त्यापेक्षाही चांगली गोष्ट म्हणजे याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. चला तर जाणून घेऊया या उपायांबद्दल…

ऑलिव्ह ऑईल आणि दह्याचा लेप

ऑलिव्ह ऑईल आणि आंबट दही एकत्रित मिक्स करावे आणि हे मिश्रण आपल्या चेहर्‍यावर व मानेवर व्यवस्थित लावावे. हे मिश्रण चेहऱ्यावर किमान 20 मिनिटे राहू द्या. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या सहज कमी होतील. दह्यामध्ये उपस्थित लॅक्टिक आम्ल आणि इतर नैसर्गिक एंजाइम्स आपल्या त्वचेच्या पेशी पूर्णपणे शुद्ध करतात आणि त्यांना नैसर्गिकपणे घट्ट करतात (Home Remedies on wrinkles problem).

दही आपल्या त्वचेवरील डागही कमी करते, ज्यामुळे आपली त्वचा गुळगुळीत आणि चमकदार बनते. त्याच वेळी, ऑलिव्ह ऑईलमध्ये अ, डी, ई आणि के जीवनसत्त्वे भरपूर असतात आणि त्यातील अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आपल्या त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करतात.

चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या का येतात?

आपले वय वाढत असताना, तोंडावर सुरकुत्यादेखील दिसू लागतात. जेव्हा हे आपल्या लक्षात येते, तेव्हा आपल्या त्वचेतील लवचिकता आणि मॉइश्चरायझर कमी होऊ लागलेले असते. ज्यामुळे आपली त्वचा सैल होते आणि शरीरावर सुरकुत्या दिसू लागतात. बदलती जीवनशैली, धावपळीचे आयुष्य आणि अयोग्य आहार यामुळे कधीकधी लहान वयातच या सुरकुत्यांची समस्या सुरू होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

(Home Remedies on wrinkles problem)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.