Lip Care | ओठांच्या कोरडेपणामुळे त्रस्त आहात? मग, घरच्या घरी तयार करा ‘लीप मास्क’!

तुम्ही-आम्ही नाहीतर प्रत्येकालाच गुलाबी आणि मऊ ओठ आवडतात, जे आपल्या सौंदर्यात आणखी भर घालतात.

Lip Care | ओठांच्या कोरडेपणामुळे त्रस्त आहात? मग, घरच्या घरी तयार करा ‘लीप मास्क’!

मुंबई : तुम्ही-आम्ही नाहीतर प्रत्येकालाच गुलाबी आणि मऊ ओठ आवडतात, जे आपल्या सौंदर्यात आणखी भर घालतात. पण, कधीकधी व्यस्त जीवनशैलीमुळे आणि योग्य ती काळजी न घेतल्यामुळे आपल्या ओठांचा रंग फिकट होऊ लागतो. याव्यतिरिक्त, हळूहळू ओठांचा नैसर्गिक ओलावा देखील कमी होऊ लागतो. अशा परिस्थितीत आपण चेहऱ्यासह ओठांची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. (Homemade Lip Mask Recipe for soft and healthy lips)

या समस्येवर उपाय म्हणून बरेच प्रकारचे लोशन, स्क्रब आणि लिप मास्क बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, जर आपण आपल्या नाजूक ओठांवर कॉस्मेटिक उत्पादने वापरू इच्छित नसाल, तर आम्ही आपल्याला अशा काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्याचा वापर करून आपण आपल्या ओठांना पुन्हा मऊ-गुलाबी बनवू शकता. चला तर, जाणून घेऊया, घरच्या घरी लिप मास्क बनवून आपण ओठांचा काळपटणापासून आणि कोरडेपणापासून कशाप्रकारे मुक्त होऊ शकता…

मध आणि एव्हाकाडो
ओठांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण मध आणि एव्हकाडो मिसळून हायड्रेटिंग लिप मास्क तयार करू शकता. यासाठी, एका भांड्यात एक चमचा मध, 2 चमचे पिकलेले एव्हकाडो मिसळा. मात्र हे मिश्रण आपल्या आठोवर लावा. हे मिश्रण आपल्या ओठांना जास्त काळ हायड्रेट ठेवेल आणि ओठांची त्वचा फुटणार नाही.

लिंबू आणि मध लिप मास्क
लिंबू आणि मधांचा लिप मास्क ओठांचा काळेपटपणा दूर करतो आणि त्याच वेळी तो ओठांना मुलायम देखील करतो. हा मास्क तयार करण्यासाठी एका भांड्यांत लिंबू रस आणि मध एकत्र मिसळा. ही पेस्ट ओठांवर लावा आणि काही वेळाने कोमट पाण्याने धुवा.

ब्राऊन शुगर आणि कोरफड जेल
हा लीप मास्क तयार करण्यासाठी ब्राऊन शुगरमध्ये कोरफड जेल मिसळा. यात अँटी-इंफ्लामेटरी आणि स्कीन हिंलीग गुणधर्म आहेत, ज्यामुळे ओठ मऊ आणि मुलायम राहतात (Homemade Lip Mask Recipe for soft and healthy lips).

डाळिंब आणि साय
डाळिंब आणि साय यांचा लीप मास्क बनवण्यासाठी एका वाटीत प्रथम डाळिंबाचा रस घ्या आणि त्यात दुधाची ताजी साय आणि व्हिटामिन ई कॅप्सूल मिसळा. हे मिश्रण ओठांवर लावल्यानंतर हलक्या हातांनी मसाज करा आणि काही वेळाने कोमट पाण्याने ओठ स्वच्छ धुवा.

गुलाबच्या पाकळ्या आणि मध
ओठांच्या समस्य दूर करण्यास गुलाबाच्या पाकळ्या देखील मदत करतात. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून, त्यात लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण झोपण्या पूर्वी ओठांवर लावा. काही दिवसांत आपली ही समस्या दूर होईल. केवळ मध लावल्याने देखील ओठांच्या समस्येतून आराम मिळतो.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Homemade Lip Mask Recipe for soft and healthy lips)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI