पुरुषांनी महिन्यातून कितीदा दाढी करावी? दररोज दाढी करणं हानीकारण? जाणून घ्या योग्य प्रमाण
सध्या तरुणाईमध्ये दाढी वाढवण्याचा कल दिसून येत आहे. दाढीच्या वेगवेगळ्या स्टाईल तरुणांमध्ये पॉप्युलर होत आहेत. काही जण फ्रेंच बीयर्ड कट ठेवतात, तर काही जणांना लांब दाढी ठेवायला आवडते.

सध्या तरुणाईमध्ये दाढी वाढवण्याचा कल दिसून येत आहे. दाढीच्या वेगवेगळ्या स्टाईल तरुणांमध्ये पॉप्युलर होत आहेत. काही जण फ्रेंच बीयर्ड कट ठेवतात, तर काही जणांना लांब दाढी ठेवायला आवडते. मात्र काही लोक असेही असतात ज्यांना क्लीन शेव ठेवायला आवडते. त्यामुळे ते दररोज दाढी करतात.आपली दाढी कशी असावी, दररोज दाढी करायची की नाही करायची? हे लोक आपल्या मर्जीनुसार ठरवतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? की याचा थेट संबंध तुमच्या आरोग्याशी देखील असतो. काही लोकांची त्वचा ही खूपच सेंसिटिव्ह असते. अशा लोकांसाठी दररोज दाढी करणं नुकसानदायक ठरू शकतं. जाणून घेऊयात महिन्यातून कितीदा दाढी करणं योग्य आहे.
तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुम्हालाही जर दाढी वाढवायला आवडत असेल तर दाढी वाढवल्यामुळे तुमचं कोणतंही नुकसान होत नाही. मात्र साफ-सफाईची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. जर तुम्ही दाढी वाढवली असेल आणि तिची स्वच्छता योग्यप्रकारे ठेवू शकत नसाल तर तुम्हाला त्वचेशी संबंधित काही आजार होण्याची शक्यता असते. इंफेक्शन होऊ शकतं, त्वचेला खाज सुटणे, जळजळ होणे या सारख्या गोष्टी होऊ शकतात.
आता प्रश्न हा आहे की? दररोज दाढी करावी की न करावी, दररोज दाढी केल्यास नुकसान होऊ शकते का? जाणून घेऊयात या प्रश्नाचं उत्तर. याबाबत बोलताना तज्ज्ञ असा सल्ला देतात की तुम्ही जर दररोज दाढी करत असाल तर त्यामुळे कोणतंही नुकसान होत नाही. मात्र त्यासाठी योग्य ट्रीमर किंवा ब्लेडचा उपयोग करावा. मात्र ज्याची त्वचा ही खूपच सेंसिटिव्ह आहे, अशा लोकांनी शक्यतो दररोज दाढी करू नये, यामुळे त्वचेशी संबंधित काही समस्या निर्माण होण्याची भीती असते. दाढी केल्यानंतर जर तुमच्या त्वचेची जळजळ होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्वचा विकार तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता, त्याचा तुम्हाला फायदा होईल. ज्या लोकांची त्वचा ही सामान्य आहे, असे लोक दररोज किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा दाढी करू शकता.
टीप वरील माहिती ही उपलब्ध माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे, ‘टीव्ही 9’ या माहितीची कुठलीही पुष्टी करत नाही. जर तुम्हालाही त्वचेशी संबंधित काही समस्या असतील तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.