AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी कांद्याचा योग्य वापर कसा करावा?

Hairfall Problem: पावसाळ्यात केस गळती रोखण्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत? केस गळतीच्या समस्येपासून कसे मुक्त व्हावे? चला या लेखातून जाणून घेऊया

केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी कांद्याचा योग्य वापर कसा करावा?
hairfall
| Edited By: | Updated on: Aug 04, 2025 | 4:22 PM
Share

सर्वांना लांब आणि चमकदार केस हवे असतात. परंतु, निरोगी त्वचेसाठी आणि केसांसाठी तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळणे गरजेचे असते. पावसाळा येताच लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात केसांमध्ये कोंडा, संसर्ग यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या ऋतूतील लोकांची सर्वात मोठी समस्या केस गळणे असते. हे टाळण्यासाठी लोक अनेक घरगुती उपाय देखील वापरतात. यामुळे पावसाळ्यात केस गळणे कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला या घरगुती उपायाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही देखील या उपायाचा फायदा घेऊ शकाल.

प्रत्येक घरात आढळणारा कांदा किसून त्याचा रस काढा. कांदा खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. कांदा खाल्ल्यामुळे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. त्यानंतर, हा रस नारळाचे तेल आणि लिंबाच्या रसात मिसळा. कांदा खाण्याचे अनेक फायदे आहेत. कांद्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असल्याने ते हृदयासाठी खूप चांगले असतात. तसेच, ते पचनक्रिया सुधारतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

हे संपूर्ण द्रावण चांगले मिसळा, केसांना लावा आणि १० मिनिटे चांगले मसाज करा. अर्धा तास थांबा आणि सौम्य शाम्पूने केस धुवा. आठवड्यातून २-३ वेळा ही संपूर्ण प्रक्रिया केल्याने केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळेल. कांदा केसांना मजबूत करतो आणि केस गळती देखील थांबवतो. कांद्यामध्ये आढळणारे सल्फर केसांच्या वाढीस मदत करते. लिंबूमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात जे कोंड्यापासून आराम देतात आणि केसांची मुळे स्वच्छ ठेवतात. हे मिश्रण केसांना लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. यासोबतच ते केसांना जीवंतपणा देखील देते. वर दिलेली माहिती पूर्णपणे बरोबर आहे असा आमचा दावा नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराला अधिक फायदे मिळतात, कारण उष्णतामुळे काही पोषक तत्वे नष्ट होण्याची शक्यता असते, असे एका आरोग्य वेबसाइटने म्हटले आहे.

कांदा खाण्याचे फायदे

कांद्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स, जसे की क्वेरसेटिन, शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकार आणि उच्च रक्तदाब यांचा धोका कमी होतो. कांद्यामध्ये फायबर भरपूर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच, ते पोटातील बॅक्टेरियाच्या संसर्गापासून संरक्षण करते आणि पचनसंस्था मजबूत करते, असे एका आरोग्य वेबसाइटने म्हटले आहे. कांद्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर विविध आजारांशी लढण्यासाठी सक्षम होते. कांद्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीराला फ्री-रॅडिकल्सपासून वाचवतात, ज्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. कांद्यामध्ये असलेले पोषक तत्व हाडांची घनता वाढवण्यासाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहेत. कांदा नैसर्गिकरित्या थंड असतो, त्यामुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते, असे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. कांदा पोटातील ऍसिडिटी कमी करतो आणि पचनास मदत करतो.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.