प्रवास करताना तुम्हालाही मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होतो, तर हा उपाय करा
प्रवास करत असताना अनेकांंना मळमळ किंवा उलट्या होण्याचा त्रास होतो. हो एक प्रकारचा मानसिक त्रास असतो. प्रवास करताना अनेकांच्या मनात ही भीती असते की त्यांना उलटी तर होणार नाही. असे कशामुळे होते. असा त्रास होत असेल तर काय उपाय केला पाहिजे जाणून घ्या.
motion sickness : प्रवास करत असताना बर्याच जणांना उलटी होण्याची समस्या असते. त्यामुळे अशा लोकांना प्रवास करणे आवडत नाही. प्रवासाचा नुसता उल्लेख केला तरी त्यांना मळमळ सुरु होते. अशा व्यक्तींना प्रवासादरम्यान उलट्या येणे, चक्कर येणे, मळमळणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. बसने प्रवास करताना किंवा विमानात देखील काही लोकांना त्रास होतो. याला मोशन सिकनेस म्हणतात. यामध्ये व्यक्तीला चक्कर येणे, उलट्या होणे, चक्कर येणे, थकवा येणे, पोटदुखी, अस्वस्थ वाटणे किंवा चिडचिड होणे अशा तक्रारी असतात.
मोशन सिकनेस कसा टाळायचा?
- प्रवासात जर उलट्या किंवा मळमळ होत असेल तर तुम्ही आले, पुदिना, लिंबू सोबत ठेवू शकता. यामुळे उलटीची भावना कमी होते.
- प्रवास करताना लवंग आणि वेलची जरूर ठेवावी. जेव्हा तुम्हाला उलट्या झाल्यासारखे वाटेल तेव्हा ते तोंडात ठेवा. तुम्हाला हवे असल्यास ते कोमट पाण्यात मिसळून पिऊ शकता.
- मोशन सिकनेसचा त्रास असलेल्या व्यक्तींनी प्रवासात कधीही पुस्तके किंवा मासिके वाचू नयेत, असे केल्याने मन खूप भरकटू शकते.
- प्रवास करण्यापूर्वी कधीही खूप खाऊ नये. यामुळे अपचनाचा धोका वाढतो ज्यामुळे उलट्या होऊ शकतात.
- बस किंवा कारच्या मागील सीटवर कधीही बसू नका कारण येथे धक्का अधिक जाणवतो, ज्यामुळे मोशन सिकनेस वाढू शकतो.
- ट्रेन, बस किंवा मोठ्या कारमध्ये प्रवास करत असाल तर वाहन ज्या दिशेने जात असेल त्याच दिशेने तोंड करून बसा, विरुद्ध दिशेने बसल्याने चक्कर येऊ शकते.