AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये समावेश करा ‘हे’ हेल्दी फूड !

वाढलेले वजन ही एक मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते.

वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये समावेश करा 'हे' हेल्दी फूड !
| Updated on: Mar 29, 2021 | 10:34 AM
Share

मुंबई : वाढलेले वजन ही एक मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करीत नाहीत आणि जे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात ते खाण्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. यामुळे व्यायाम करू देखील काही फायदा होत नाही. खरोखरच वजन कमी करायचे असेल तर आजच आपल्या आहारात खाली दिलेल्या पदार्थांचा समावेश करा. (Include healthy foods in your diet to lose weight)

प्रथिनेयुक्त बदाम आपले स्नायू तयार करण्यात मदत करतात. यासह बदाममध्ये आढळणारे फॅट चांगले आणि निरोगी असते, जे आपल्या शरीराचे बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय राखण्यास मदत करते. यामुळे पोटाच्या आसपासची चरबी कमी होते. जर आपले पोट देखील बाहेर येत असेल तर आपल्या डाएटमध्ये मूठभर बदामाचा समावेश करा. बदाम भूक नियंत्रित करण्यास खूप मदत करते.

जर आपण 2 जेवणाच्या मध्ये स्नॅक म्हणून बदाम खाल्ले तर आपले पोट बर्‍याच वेळेस भरले जाईल आणि आपल्याला भूक लागणार नाही. बदामांमध्ये प्रथिने, फायबर आणि निरोगी चरबी असते जी आपली भूक नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरते. आपल्याला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यास देखील मदत करते.

जर तुम्हीही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात तर आजच आपल्या आहारामध्ये मेथीच्या दाण्यांचा समावेश करा. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. मेथीच्या दाण्यांमध्ये पुष्कळ पौष्टिक गुणधर्म असतात त्यामुळे आपली चरबी कमी होते. दररोज 10 ग्रॅम मेथीचे सेवन केले, तर शरीरावरची चरबी कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये विद्रव्य फायबर आणि ग्लूकोमोनास फायबर असते.

ते आतड्यांमधून ग्लूकोज शोषून घेण्यास आणि मधुमेह नियंत्रित करण्याचे कार्य करतात. याव्यतिरिक्त, मेथीमधील अल्कॉइड्समुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण सुधारते आणि ग्लाइसेमिक पातळी कमी होते. यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारामध्ये मेथी घेणे गरजेचे आहे.

डार्क चॉकलेट देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. चॉकलेटमध्ये बरेच पौष्टिक घटक आढळतात, विशेषत: डार्क चॉकलेट, ज्यामध्ये भरपूर कोको आणि फायबर असतात. डार्क चॉकलेटमध्ये झिंकची मात्रा सर्वाधिक आहे, जी शरीराचे 300 एन्झाइम्स सक्रिय करते. तसेच, चयापचय वाढवण्याचे काम करते. याव्यतिरिक्त, चॉकलेटमध्ये लोह, मॅग्नेशियम, तांबे, मॅंगनीज, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियमची मात्रा देखील भरपूर असते.

संबंधित बातम्या : 

(Include healthy foods in your diet to lose weight)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.