आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास होईल मदत

तज्ज्ञांच्या मतानुसार ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे, अशाच लोकांना कोरोना झाल्याचे किंवा कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणेे महत्त्वाचे ठरते. असे अनेक पदार्थ आहेत, ज्याचा आहाराक समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.

आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास होईल मदत
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 6:42 PM

Health tips : तज्ज्ञांच्या मतानुसार ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशाच लोकांना कोरोना झाल्याचे किंवा कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आजचे युग हे धकाधकीचे आहे. लाईफस्टाईल बिझी झाली आहे. अवेळी जेवन, पुरेशी झोप न घेणे, व्यायामाचा अभाव यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत बनली आहे. प्रतिकार शक्ती कमकुवत झाल्याने आरोग्याशी संबंधित विविध समस्या निर्माण होत आहेत. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने सर्दी, खोकला (Cold and cough) या सारख्या आजारांची तर सहज लागन होते. थोडक्यात काय तर तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने तुम्ही विविध आजारांना सहज बळी पडू शकतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे असणे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी (Immunity boosting) नियमित व्यायाम, (Exercise)पुरेशी झोप या गोष्टी जेवढ्या आवश्यक आहेत. त्याचसोबत आहारात योग्य पदार्थांचा समावेश करने देखील महत्त्वाचे आहे. आज आपण अशाच काही पदार्थांबाबत माहिती घेणार आहोत.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये अनेक आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म असतात. मात्र फार थोडे लोक या भाजीचे सेवन करतात. मात्र तज्ज्ञांकडून या भाजीचा नियमित आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. ब्रोकलीमध्ये संत्र्यांइतकेच व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे तज्ज्ञांकडून ब्रॉकोलीचा आहारत समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

गाजर

गाजरामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. गाजराच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकार शक्ती दुपटीने वाढते. गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे काही काळानंतर व्हिटॅमिन ए मध्ये बदलते. व्हिटॅमिन ए मध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करतात.

आले

आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी आले प्रभावी मानले जाते. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म सर्दीशी संबंधित अनेक समस्या दूर करतात. एवढेच नाही तर याच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते. त्यामुळे आहारात नियमितपणे अल्याचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

रताळे

यामध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. तज्ज्ञांच्या मते, याचे सतत सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि व्हिटॅमिन सीची कमतरताही पूर्ण होते. तुम्ही शिजून किंवा भाजून रताळ्याचे सेवन करू शकाता.

टीप – वरील माहिती ही केवळ सामान्यज्ञानासाठी देण्यात आली आहे. डायट प्लॅन ठरवण्यासाठी आहार तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.

संबंधित बातम्या

हो खरयं… आता वेळ आलीयं ‘मास्क फ्री’ जगण्याची… काय आहे नेमका दावा…

Eye Care | ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांची आग होतेय? चिंता नको, साधे-सोपे उपाय करा

Hair care tips : या सुगंधी फुलांनी तुमचे केस सुंदर बनवा! ते कसे वापरायचे हे जाणून घ्या!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.