Pregnancy Diet : गर्भावस्थेत ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

गर्भावस्थादरम्यान, बाळ आणि आई दोघांच्याही आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. गर्भवती महिलेने नियमित आहार घ्यावा.

Pregnancy Diet : गर्भावस्थेत 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा
हेल्दी आहार

मुंबई : गर्भावस्थेदरम्यान, बाळ आणि आई दोघांच्याही आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. गर्भवती महिलेने नियमित आहार घ्यावा. गर्भावस्थेदरम्यान हेल्दी आणि निरोगी आहार घेणे बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी आपण आराहात जास्त हिरव्याभाज्या आणि फळांचा समावेश केल्या पाहिजे. त्यामध्येही सध्याच्या कोरोनाच्या काळात आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असा पदार्थांचा समावेश केला तर अधिक फायदेशीर राहिल. (Include these foods in your diet during pregnancy)

गर्भावस्थेदरम्यान काय खावे

ब्रोकोली – ब्रोकोली ही एक आपल्या आरोग्यासाठी असलेले फायदेशीर भाजी आहे. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर समृद्ध असलेले अन्न पाचन तंत्रामध्ये सुधारणा करण्यास मदत करते, जेणेकरून बद्धकोष्ठता, सूज येणे किंवा गॅस यासारख्या समस्या टाळता येतील. हिरव्या भाज्या जसे ब्रोकोली, पालक या हिरव्या भाज्यामध्ये फायबर आणि फॉलेट, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियम सारखे इतर पोषक घटक असतात.

सॅल्मन – सॅल्मन फिशमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. ते बाळाच्या मेंदूच्या विकासास मदत करते. सॅल्मनशिवाय, मॅकेरल आणि हेरिंग सारख्या इतर प्रकारच्या सीफूडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा चांगला स्रोत असतो.

राजमा – राजमामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. राजमाची भाजी तयार करून आपण खाऊ शकतो. तसेच सूपमध्ये देखील राजमा मिक्य करू शकतो. राजमा खाल्ल्याने तुमच्या शरीरातील प्रथिन्यांची पातळी चांगली राहते. रात्री राजमा पाण्यात भिजवून सकाळी आपण खाऊ शकतो.

किली – किवी कमी कॅलरीज असणारे एक पौष्टिक फळ आहे. किवी फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात. किवी खाल्ल्याने पाचन शक्तीत वाढ होते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. किवीमुळे सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स शांत झोपेसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत.

दूध – दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुधात प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12 आणि पोटॅशियम असते. यासाठी गर्भवती महिलांनी दिवसातून किमान दोन ग्लास दूध पिले पाहिजे.

डाळ – डाळ प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. मूग, मसूर, हरभरा आणि उडीद अशा अनेक प्रकारच्या डाळीमध्ये उच्च प्रथिने असतात. आपण दररोज आहारामध्ये डाळ देखील समाविष्ट करू शकता.

पालक- पालक लोहासारख्या पौष्टिक घटकांनी समृद्ध आहे. त्यात प्रथिनेही असतात. आपण पराठे, भाज्या, मसूर आणि खिचडी इत्यादीमध्ये पालक वापरू शकता.

गरोदरपणात काय खाऊ नये

कच्चे अंडे – साल्मोनेलाचा संसर्ग टाळण्यासाठी कच्चे अंडे खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. यामुळे मळमळ, पोटात दुखणे, अतिसार आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो. म्हणून, गरोदरपणात कच्चे अंडी खाणे टाळले पाहिजे.

प्रक्रिया केलेले मास – बर्‍याच दिवसांपासून साठवलेले मासामध्ये बॅक्टेरिया होतात. कच्चे, प्रक्रिया केलेले मास यादरम्यान खाणे टाळले पाहिजेत. यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. या काळात असे पदार्थ खाणे टाळा.

कॅफिन – जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्यास बाळाची वाढ रोखू शकते. म्हणून, गर्भवती महिलांनी दररोज 200 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिन टाळावे.

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Include these foods in your diet during pregnancy)