अबब…एक्सप्रेस आहे की बैलगाडी, अहो चालत जाणार माणूसही मागे टाकेल, तरीही लोकं आनंदाने प्रवास करतात
India Slowest Train :एक्स्प्रेस म्हंटल की त्या गाडीचा वेग लक्षात घेता आपण काही तासातच आपल्या ठिकाणी पोहचतो. पण तुम्हाला या एक्सप्रेस बद्दल माहित आहे का जी इतक्या संथ गतीने चालते की चालत जाणारा माणूस सुद्धा या एक्सप्रेसच्या पुढे निघून जाईल एवढी धीम्या गतीने ही एक्सप्रेस रेल्वे रुळावर धावत असते. तरीही लोक या प्रवासाचा पुरेपूर आनंद घेतात.

भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. अशातच बाहेर लांब पल्ल्याच्या प्रवासातही मेल, एक्स्प्रेस, दुरंतो, राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत या एक्सप्रेसबरोबरच मालगाडी देखील भारतभर चालवल्या जातात. आताच्या आधुनिक आपल्या भारत देशात रेल्वे गाड्यांचा वेग वाढविण्याचे प्रयत्न देखील सुरू असून हायस्पीड ट्रेन चालवण्याची तयारी केली जात आहे, तर दुसरीकडे या एक्सप्रेसमध्ये अशी एक एक्सप्रेस आहे जी केवळ ४६ किलोमीटर चे अंतर पार करण्यासाठी ५ तासांहून अधिक वेळ घेणारी ही एक्सप्रेस आहे.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या एक्सप्रेसमधून प्रवास करताना 5 तास लागतात, परंतु तुम्ही जेव्हा पार्टीचा प्रवास करता तेव्हा फक्त या एक्सप्रेसने तुम्हाला 3 तास लागतात. असे असून सुद्धा अनेक लोक या एक्सप्रेसला पाहण्यासाठी आणि त्यातून प्रवास करण्यासाठी या ठिकाणी येऊन भेट देत असतात आणि एक्सप्रेसमधून प्रवास करत अनेक ठिकाण एक्सप्लोर करत असतात. चला तर मग जाणून घेऊयात या एक्सप्रेसचे नाव आणि भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
देशातील सर्वात संथ गतीने धावणारी एक्सप्रेस




एक्सप्रेस म्हंटल की त्या गाडीचे स्पीड आपल्या लक्षात येत. पण तुम्हाला हे वेगळं आश्चर्यकारक वाटत असले तरी ही देशातील सर्वात धीम्या गतीची एक्सप्रेस आहे. यूनेस्को वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत या एक्सप्रेसचा समावेश करण्यात आला आहे. एक्स्प्रेस असूनही ती इतकी संथ गतीने चालते की चालत जाणारी व्यक्ती त्या एक्सप्रेसच्या पुढे निघून जाते. तरीही लोक या एक्सप्रेमधून प्रवासाचा पुरेपूर आनंद घेतात. केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक येथे या एक्सप्रेसला पाहण्यासाठी आणि त्यातून प्रवास करण्यासाठी येत असतात.
नीलगिरी माउंटेन एक्सप्रेस
या एक्सप्रेसचे नाव नीलगिरी माउंटेन एक्सप्रेस असे आहे. तामिळनाडू राज्यातील मेट्टुपलायम स्थानकापासून उटीच्या उधगमंडलम स्थानकापर्यंत ही एक्सप्रेस धावते. डोंगरदऱ्या-खोऱ्यांतून आणि उतारातून जाणाऱ्या या एक्सप्रेसमधून निसर्गाचं दृश्य पाहण्यासारखे आहे. या प्रवासादरम्यान ही गाडी १६ बोगदे, २५० पूल आणि २०८ वळणदार वळणांतून जाते. या प्रवासाला ५ तास लागतात कारण एक्सप्रेसला उंच उंच डोंगर पार करावे लागते, या दरम्यान तिचा सरासरी वेग ताशी ९ किलोमीटर असतो. याउलट परतीचा प्रवास करताना डोंगरावरून खाली येताना उताऱ्यामुळे परतीच्या प्रवासाला अवघे ३ तास लागतात.
या एक्सप्रेसमधून प्रवास करताना एवढेच पैसे खर्च करावे लागतात
भारतातील सर्वात धीम्या गतीने धावणारी या एक्सप्रेसचे भाडे खूपच कमी आहे. फर्स्ट क्लाससाठी ५४५ रुपये, तर सेकंड क्लासच्या तिकिटासाठी २७० रुपये मोजावे लागतात. मेट्टुपलायमहून सकाळी ७.१० वाजता हि एक्सप्रेस सुटते आणि दुपारी १२.०० वाजता उटीला पोहोचते. परतीच्या प्रवासात करताना ही गाडी उटीहून दुपारी २.०० वाजता सुटते आणि सायंकाळी ५.३५ वाजता मेट्टुपलायमला पोहोचते. या काळात ही एक्सप्रेस तुम्हाला येथील कुनूर, वेलिंग्टन, अरावनकाडू, केट्टी आणि लव्हडेल या ठिकाणी थांबून तुम्हाला जागा एक्सप्लोर करून ही एक्सप्रेस योग्य वेळेत मेट्टुपलायमला पोहोचते. तुम्हाला कधी संधी मिळाल्यास या एक्स्प्रेसमधून प्रवास करून एक अविस्मरणीय क्षण नक्की आठवणीत ठेऊ शकता.