AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात मखाना भाजून खाण्याऐवजी ‘या’ वेगळ्या प्रकारे खाल्ल्याने पोट राहील थंड, जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजलेला मखाना मोठ्या प्रमाणात सेवन करतात. पण तुम्हाला माहित आहे का की उन्हाळ्यात तो वेगवेगळ्या प्रकारे खाल्ल्याने तुमचे पोट थंड राहण्यासही मदत होऊ शकते. कसे ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात मखाना भाजून खाण्याऐवजी 'या' वेगळ्या प्रकारे खाल्ल्याने पोट राहील थंड, जाणून घ्या
मखानाImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Apr 28, 2026 | 4:12 PM
Share

बदलत्या जीवनशैलीत जेव्हा हेल्दी डाएटचा विचार केला जातो. तेव्हा अनेकजण मखाने खाण्याचा विचार करतात. तसेच गेल्या काही वर्षांपासून मखाने खूप लोकप्रिय झालेले आहेत. मखाना हा एक सुपरफूड आहे. कारण त्यात शरीरासाठी आवश्यक असलेली अनेक पोषक तत्वे असतात. भारतात आपल्यापैकी अनेकजण् तुपात मखाना भाजून खातात. तर काही जण विविध फ्लेवर असलेले मखाने खाण्याचा आनंद घेतात. तर आहारात मखाना खाण्याची दोन प्रमुख कारणे म्हणजे त्याचे पौष्टिक मूल्य आणि त्याची उत्कृष्ट चव. मात्र उन्हाळ्यात तूप आणि विविध मसाल्यांसोबत भाजून खाल्याने शरीरासाठी थोडे धोकादायक ठरू शकते. खरे तर तूप आणि मसाले पोटात उष्णता निर्माण करतात आणि पचनसंस्थेला नुकसान पोहोचवतात. त्यामुळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात हलके आणि सहज पचणारे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

तुम्ही सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात एक-दोन वाट्या भाजलेले मखाने खाता का? या लेखात आपण उन्हाळ्याला साजेशी अशी मखाने खाण्याची पद्धत जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात या पदार्थांचे सेवन ठरते उत्तम

उष्णतेच्या लाटेत किंवा गरम हवामानात पोट लवकर गरम होते. त्यामुळे पोटाला नैसर्गिकरित्या थंडावा देणारे पदार्थ सेवन करावे. पोट थंड ठेवण्यासाठी उन्हाळ्यात बेलफळ, सत्तू आणि काकडी यांसारखे पदार्थ भरपूर प्रमाणात खावेत. याव्यतिरिक्त, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. इतकेच नाही तर फायबरयुक्त पदार्थ आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध तसेच उच्च पाणी असलेले पदार्थ खावेत.

उन्हाळ्यात मखाना कसा खावा?

मखाना चाट

आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ सांगतात की मखाना एक सुपरफूड आहे. त्यात फायबर, पोटॅशियम आणि इतर अनेक पोषक तत्वे असतात. मात्र तुम्ही जर ते भाजून खात असाल, तर त्याचे प्रमाण मर्यादित ठेवा. त्याचे जास्त सेवन केल्याने शरीरातील पाणी कमी होऊ शकते. तज्ञ उन्हाळ्यात मखाना चाट खाण्याची शिफारस करतात. जसे की काकडी, टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून त्यात मखाने मिक्स करा आणि या चाटचे सेवन करा. तसेच जास्त मखाना खाल्ल्याने ते जड वाटू शकते, म्हणून भाज्यांचा समावेश करून ते संतुलित करा. अशा प्रकारे मखाने खाल्याने तुम्हाला अधिक पोषक तत्वांसह दुप्पट फायदे मिळतात.

मखाना रायता

उन्हाळ्यात मखाना हा दह्यासोबत खाणे सर्वोत्तम ठरते. तर हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम प्रोबायोटिक पदार्थ आहे. दह्याचा थंडावा देणारा गुणधर्म आणि मखान्याची शक्ती शरीराला आतून अविश्वसनीय ऊर्जा देऊ शकते. दह्यामध्ये कॅल्शियम असते आणि मखान्यातही अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळे आपले स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी हे एक उत्कृष्ट मिश्रण आहे. मखाना तुपात भाजून घ्या आणि नंतर फेटलेल्या दह्यात मिक्स करून खा. पोट थंड ठेवण्यासाठी इच्छित असल्यास तुम्ही त्यात पुदिना देखील‍ मिक्स करू शकता. मखाना रायता हा उन्हाळ्यातील जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहे.

मखाना स्मूदी

उन्हाळ्यात पोट थंड ठेवण्यासाठी तुम्ही मखाना स्मूदी सुद्धा बनवू शकता. यासाठी मखान्याची पूड करून ती ताकात भिजवा. आणि हे मिश्रण रात्रभर फ्रिजमध्ये ठेवावे लागेल. दुपारच्या जेवणाच्या वेळेत हे पेय प्या. हे एक असे सुपर ड्रिंक आहे जे कडक उन्हातही तुमचे पोट थंड ठेवू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले