ऑनलाईन व्हिडीओ पाहून योगा, व्यायाम करताय?; मग हे लगेच वाचाच!

कोरोनामुळे सध्या काही ठिकाणी ला्ॅकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे व्यायाम करण्यासाठी आपण बाहेर जाऊ शकत नाहीत.

  • Updated On - 10:01 am, Thu, 27 May 21 Edited By: Anish Bendre
ऑनलाईन व्हिडीओ पाहून योगा, व्यायाम करताय?; मग हे लगेच वाचाच!
योगा

मुंबई : कोरोनामुळे सध्या काही ठिकाणी ला्ॅकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे व्यायाम करण्यासाठी आपण बाहेर जाऊ शकत नाहीत. यामुळे अनेकांचे वजन वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी अनेकजण आॅनलाईन पध्दतीने व्हिडीओ पाहून व्यायाम आणि योगा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, असे करणे अतिशय धोकादायक आहे. कारण आपण जेंव्हा व्हिडीओ पाहुण योगाच्या स्टेप करतो तेंव्हा बऱ्याच वेळा आपल्याकडून चुका होण्याची शक्यता असते. (It is dangerous to do yoga and exercise by watching videos online)

यामुळे आपले शरीर ताणण्याची शक्यता असते आणि चुकीच्या पध्दतीने व्यायाम केल्या तर आपल्या शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे शक्यतो आॅनलाईन पध्दतीने व्हिडीओ पाहुण व्यायाम करणे टाळा. मात्र, आपण आॅनलाईन पध्दतीने एखादा योगा क्लास किंवा व्यायामाचा क्लास लावून योगा आणि व्यायाम करू शकतो. कारण त्या ठिकाणी आॅनलाईन पध्दतीने प्रशिक्षक आपण काय करतो आहे, याकडे लक्ष देत असतात.

व्यायाम करणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण व्यायाम करण्यासाठी बाहेर देखील जाऊ शकत नाहीत. देशामध्ये अनेक राज्यांमध्ये सध्या लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांनी व्यायाम करणे बंद देखील केले आहे. मात्र, या कोरोनाच्या काळातच आपल्याला अधिक व्यायाम करण्याची गरज आहे. कारण या काळात निरोगी राहून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे महत्वाचे झाले आहे.

घरात राहून नेमका कोणता व्यायाम करावा हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. आज आम्ही तुम्हाला काही खास व्यायाम सांगणार आहोत. ते केल्याने तुम्ही निरोगी राहाल तसेत तुमचे वजन देखील वाढणार नाही आणि तुम्ही घरचे घरी हा व्यायाम करू शकणार आहेत. दोरीवरच्या उड्या बहुतेक लोकांना असे वाटते की, दोरीवरच्या उड्या मारणे फक्त लहान मुलांसाठी असते. पण प्रत्येक वयोगटातील लोकांनी दोरीवरच्या उड्या मारल्या पाहिजेत.दोरीवरच्या उड्या मारणे हा एक सोपा व्यायाम आहे, जो हृदयाचे ठोके सुधारतो.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(It is dangerous to do yoga and exercise by watching videos online)