शारीरिक फिटनेसशिवाय व्यायामाचे आहेत ‘हे’ फायदे, वाचाल तर नियमित व्यायाम कराल!

आपल्यापैकी बरेच जण वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात. तसेच, काही टोन बॉडी आणि एब्ससाठी दररोज वर्कआउट करतात. जेव्हा आपले शरीर तंदुरुस्त आणि टोन केलेले दिसते तेव्हा बहुतेक लोकांना व्यायामाचे फायदे समजतात.

शारीरिक फिटनेसशिवाय व्यायामाचे आहेत 'हे' फायदे, वाचाल तर नियमित व्यायाम कराल!
व्यायाम

मुंबई : आपल्यापैकी बरेच जण वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात. तसेच, काही लोक टोन बॉडी आणि एब्ससाठी दररोज वर्कआउट करतात. जेव्हा आपले शरीर तंदुरुस्त आणि टोन केलेले दिसते तेव्हा बहुतेक लोकांना व्यायामाचे फायदे समजतात. मात्र, व्यायाम केल्याने फक्त एवढेच फायदे होत नाहीतर यापेक्षाही जास्त फायदे व्याायाम केल्याने होतात. व्यायाम केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. (3 benefits of exercise in addition to weight loss)

चांगली झोप येते

व्यायामामुळे तणावाची पातळी कमी होते. यामुळे आपल्याला चांगली झोप येते. झोप पूर्ण झाल्याने बऱ्याच रोगांपासून शरीराचे संरक्षण होते, मेंदू स्थिर राहतो आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. मानवी शरीराला 7-9 तासांची झोप आवश्यक असते. परंतु आपल्यापैकी बर्‍याच लोकांना चांगली झोप येत नाही आणि त्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडलेली असते. चांगल्या झोपेसाठी, आपण दररोज व्यायाम केला पाहिजे.

ताण कमी करण्यासाठी

जर आपण मनाला शांत ठेवण्यासाठी व्यायाम करत असाल तर ताण कमी होतो. नियमित व्यायाम केल्याने कोर्टिसोल आणि एपिनेफ्रिन सारख्या हार्मोन्सची पातळी कमी होण्यास मदत होते. हे आपले लक्ष वाढवते. तसेच तुमचा मूडही चांगला ठेवण्याचे कार्य करते.

जमिनीवर बसून जेवा

सुखासनात बसून अन्न ग्रहण केल्याने शरीर मजबूत, सक्रिय आणि स्वस्थ राहते, म्हणून नेहमी जमिनीवर बसूनच जेवावे. असे केल्याने पाठीचे आणि मणक्याचे स्नायू व पेल्विस सक्रिय राहते. या आसनात बसून जेवताना आपले संपूर्ण शरीर नैसर्गिक अवस्थेत राहते. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. तसेच नाडीतंत्र देखील उत्कृष्ट कार्य करते.

चालणे

चालणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. सोपा आणि उत्तम व्यायाम म्हणजे चालणे होय. जे लोक दररोज फिरायला जातात. त्यांना जीवघेण्या आजारांचा होण्याचा धोका कमी असतो. हा व्यायाम केल्याने तुमची रक्तातील साखर नियंत्रित होते. तर दररोज 35 ते 40 मिनिटे चाला. जर आपण सायकल चालवत असाल तर हे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. सायकलिंगमुळे हृदयाची गती वाढते आणि रक्त परिसंचरण सुधारते.

हे आसन करा

स्टेप 1: जमिनीवर आरामदायक स्थितीत बसा.
स्टेप 2: आता, आपल्या तोंडाने आत आणि बाहेर लांब श्वास घ्या.
स्टेप 3: आता ही प्रक्रिया काही वेळ पुन्हा पुन्हा करा.
स्टेप 4: यानंतर, आपल्याला प्रक्रिया पुन्हा करण्याची आवश्यकता आहे, परंतु यावेळी आपल्याला नाकाने श्वास घ्यायचा आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(3 benefits of exercise in addition to weight loss)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI