Health Tips: नाश्त्यात व्हाईट ब्रेड खाणं टाळा, आरोग्यासाठी हानिकारक!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2021 | 11:34 AM

बहुतेक लोक त्यांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ब्रेड खातात. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड उपलब्ध आहेत. बऱ्याच जणांना चहासोबत ब्रेड खायला देखील आवडते.

Health Tips: नाश्त्यात व्हाईट ब्रेड खाणं टाळा, आरोग्यासाठी हानिकारक!
ब्रेड
Follow us

मुंबई : बहुतेक लोक त्यांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ब्रेड खातात. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड उपलब्ध आहेत. बऱ्याच जणांना चहासोबत ब्रेड खायला देखील आवडते. पांढर्‍या ब्रेडचा वापर सँडविच, पेस्ट्री इत्यादी करण्यासाठी केला जातो. कदाचित आपल्याला हे माहिती नसेल की, पांढरे ब्रेड खाणे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. यामुळे आपण शक्यतो पांढरे ब्रेड खाणे टाळलेच पाहिजे. (Avoid eating white bread for breakfast)

पांढर्‍या ब्रेडवर प्रक्रिया केली जाते

पांढरे ब्रेड बनवण्यासाठी, गव्हाच्या पिठामध्ये बऱ्याच प्रकारचे रसायने ब्लीच केली जातात, ज्यामुळे पीठ पांढऱ्या रंगाचे दिसते. त्यात बेझॉयल पेरोक्साईड, क्लोरीन डाय ऑक्साईड आणि पोटॅशियम ब्रोमेट आणि परिष्कृत स्टार्च मिक्स केले जाते. या गोष्टी फार कमी प्रमाणात मिसळल्या जातात. जेणेकरून त्या आरोग्यासाठी हानीकारक होऊ नयेत म्हणून, मात्र, आपण जर दररोज ब्रेडचे सेवन केले तर ते आपल्या आरोग्यासाठी हानीकारक आहे.

पांढऱ्या ब्रेडमधील पोषण

सर्व ब्रेडमध्ये कॅलरी सामान्य असतात. या सर्वांमध्ये पोषक तत्वांमध्ये फरक आहे. एका पांढर्‍या ब्रेडमध्ये 77 कॅलरी असतात. परंतु ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असते. पांढऱ्या ब्रेडवर सर्वात जास्त प्रक्रिया केली जाते, म्हणून त्यात कमी पौष्टिक घटक असतात.

रक्तातील साखर वाढते

पांढर्‍या ब्रेडमध्ये ग्लाइसीमिक इंडेक्स खूप जास्त असतो. जो शरीरात ग्लूकोज वाढविण्याचे काम करतो. मधुमेहाच्या रुग्णांनी पांढरे ब्रेड खाणे टाळले पाहिजे. कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते जे धोकादायक असू शकते. यामुळे हृदयरोग आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो.

वजन वाढते

जर आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त रहायचे असेल तर आपल्या आहारातून पांढरे ब्रेड वगळा. पांढरे ब्रेड खाण्यामुळे तुमचे वजन वाढते, कारण ते परिष्कृत कार्बपासून बनविलेले आहे जे शरीरात साखरेची पातळी वाढवण्यास मदत करते. चरबीच्या रूपात अतिरिक्त ग्लूकोज शरीरात जमा होण्यास सुरवात होते. शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने गोड पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. ज्यामुळे वजन वाढू शकते.

ब्राऊन ब्रेड

बाजारात उपलब्ध असलेल्या बर्‍याच ब्राऊन ब्रेडमध्ये कोणत्याही प्रकारचे पौष्टिक मूल्य नसते. ज्या ब्रेडचा पॅकवर गहू असे लिहिले नाही ते ब्रेड खरेदी करु नये. बहुतेक ब्रेडमध्ये ब्राऊन फूड कलरचा वापर केला जातो. हे तुमच्या आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नाही. नेहमीच ज्या ब्रेडचा पॅकवर गहू असे लिहिले आहे तेच ब्रेड खरेदी करा. कारण ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे ब्रेड पौष्टिक आणि फायबरने समृद्ध असते.

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!

(Avoid eating white bread for breakfast)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI