Weight Loss : हे खास पेय पिऊन फक्त 1 आठवड्यामध्ये झटपट वजन कमी करा!

वाढलेले वजन कमी करताना नाकामध्ये दम येतो. काहीही केल्याने वजन काही लवकर कमी होत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. वजन वाढल्याने ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्सच्या समस्या निर्माण होतात. वजन कमी करण्यासाठी व्यायामापेक्षाही आपला आहार महत्वाचा आहे. कारण आहारामुळेच शरीरावर जास्त चरबी साठण्याची समस्या निर्माण होते.

Weight Loss : हे खास पेय पिऊन फक्त 1 आठवड्यामध्ये झटपट वजन कमी करा!
वाढलेले वजन कमी करण्यासाठी खास पेयImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 6:00 AM

मुंबई : वाढलेले वजन कमी करताना नाकामध्ये दम येतो. काहीही केल्याने वजन काही लवकर कमी होत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. वजन वाढल्याने ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्सच्या समस्या निर्माण होतात. वजन कमी करण्यासाठी व्यायामापेक्षाही आपला आहार महत्वाचा आहे. कारण आहारामुळेच शरीरावर जास्त चरबी साठण्याची समस्या निर्माण होते. आहारासोबतच वजन कमी करण्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे. विशेष म्हणजे आपण व्यायाम करण्याच्या अगोदर काय पितो हे सर्वांत महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही पेयांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा तुम्ही आहारामध्ये समावेश करून फक्त आठ दिवसामध्ये वजन कमी करू शकता.

जिरे, धणे आणि बडीशेप पेय

जिरे, धणे आणि बडीशेप एकत्र रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी व्यायामाला जाण्याच्या अगोदर हे खास पेय प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय हे आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. जिऱ्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि तांबे असते. जे आपल्या पचनास मदत करते. जिरे देखील लोहाचा चांगला स्रोत आहे. जिऱ्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. जे आपल्याला वेगवेगळ्या जीवाणूंविरुद्ध लढण्यास मदत करते. पण त्यामुळे पचनही होते.

धने

धने देखील वजन कमी करण्यास मदत करतात. त्वचा चांगली ठेवण्यामध्ये ही धने मदत करतात. धन्यात काही जंतुनाशक गुणधर्म देखील आहेत. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी धने देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. धन्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

बडीशेप

बडीशेप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. शरीराला थंड ठेवण्यासाठी बडीशेपचीही भूमिका महत्वाची असते. शरीरातील हार्मोनल संतुलन राखण्यातही बडीशेप फायदेशीर आहे. बडीशेप रक्त शुद्ध करण्यास मदत करते आणि अपचन आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.

तयार करण्याची पध्दत

एक चमचा जिरे, धणे आणि बडीशेप एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते चाळून घ्या. त्यानंतर हे पाणी अगोदर कोमट करा आणि व्यायामाला जाण्याच्या अगोदर प्या. यामुळे आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी लवकर बर्न होण्यास मदत होते. तसेच आपल्या आहारामध्ये धने आणि जिऱ्याचा जास्तात-जास्त समावेश करा. आपण फक्त बडीशेपचे पाणी देखील सकाळी रिकाम्या पोटी घेऊ शकता. यामुळेही वजन कमी होण्यास मदत होते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Skin care उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी हे फ्रूट मास्क अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक !

Health : तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, वाचा महत्वाचे!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.