AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : पावसाळ्याच्या हंगामात दररोज प्या एक ग्लास हळदयुक्त दूध, वाचा फायदे!

सध्याच्या पावसाळ्याच्या हंगामात आपण दररोज एक ग्लास हळदयुक्त दूध येणे अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे ताप, सर्दी, खोकला आणि अनेक संक्रमण होण्यापासून आपण दूर राहतो.

Health Care : पावसाळ्याच्या हंगामात दररोज प्या एक ग्लास हळदयुक्त दूध, वाचा फायदे!
हळदयुक्त दूध
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 5:35 PM
Share

मुंबई : मुळात दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दुधामध्ये प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटक असतात. मात्र, या सध्याच्या पावसाळ्याच्या हंगामात आपण दररोज एक ग्लास हळदयुक्त दूध घेणे अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे ताप, सर्दी, खोकला आणि अनेक संक्रमण रोगांपासून आपण दूर राहतो. (Drink turmeric mix milk daily during the rainy season)

हृदय निरोगी ठेवण्यासाठीही हळद अतिशय प्रभावी ठरते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हळदीचे दूध आपल्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करते. ज्यामुळे आपले आरोग्य देखील निरोगी राहते. हळदयुक्त दूध घरी तयार करण्यासाठी एक चिमूटभर हळद दुधात मिसळणे आपल्यासाठी फायदेशीर आहे.

हळदीच्या दुधाचे आणखी फायदे करून घ्यायचे असतील, तर हळदीच्या पावडर ऐवजी कच्ची हळद दुधामध्ये घालून ते दुध प्यावे.  हळदीयुक्त दुधाच्या सेवनाने चांगली झोप लागते. दुधात अमीनो अॅसिड असतात, जे चांगली झोप देण्यास प्रभावी ठरतात. हळदीच्या दुधात कॅल्शियम असते. या व्यतिरिक्त बरेच खनिजेही आहेत. ते वजन कमी करण्यात मदत करतात.

या कारणास्तव, हळदयुक्त पिले पाहिजे. दुधामध्ये कॅल्शियम असते जे हाडे मजबूत बनवते. त्याचबरोबर हळदीमध्ये असलेल्या अँटीबायोटिक्समुळेही हाडे मजबूत होतात. म्हणून, हाडांच्या दुखापतीसाठी हळद असलेले दूध पिणे चांगले. हळदीयुक्त दूध पिल्यामुळे सर्दी आणि खोकला बरा होतो. हळदीच्या दुधात प्रतिजैविक पदार्थ असतात जे शरीराची शक्ती वाढवतात.

हळदीचे दूध अनेक गंभीर आजारांशी लढण्यासाठी मदत करते. यामुळे ज्यांना कर्करोगाचा आजार आहे अशांनी दिवसातून एकदातरी हळद दूध घेतले पाहिजे. हृदय निरोगी ठेवण्यासाठीही हळद अतिशय प्रभावी ठरते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हळदीचे दूध आपल्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करते.

संबंधित बातम्या : 

Toothache | या कारणांमुळे दातात होतात वेदना, हे घरगुती उपाय देतील आराम

Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!

(Drink turmeric mix milk daily during the rainy season)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली