Apple Juice Benefits : सफरचंदचा रस अनेक रोगांवर रामबाण उपाय, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे!

सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सर्वांनी सफरचंद आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनवायला हवा. यासाठी एक सोपा उपाय म्हणजे सफरचंदाचा रस पिणे. सफरचंदाचा रस अतिशय चविष्ट असून आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

Apple Juice Benefits : सफरचंदचा रस अनेक रोगांवर रामबाण उपाय, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे!
सफरचंदचा रस

मुंबई : सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सर्वांनी सफरचंद आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनवायला हवा. यासाठी एक सोपा उपाय म्हणजे सफरचंदाचा रस पिणे. सफरचंदाचा रस अतिशय चविष्ट असून आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सफरचंदाचा रस पिण्याचे नेमके कोणते फायदे आहेत, हे आपण बघणार आहोत.

सफरचंदाच्या रसामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही याचे सेवन करू शकता. हे एक अतिशय चवदार पेय आहे. फायबर तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवते आणि जंक फूड किंवा अस्वास्थ्यकर अन्न खाण्यापासून प्रतिबंधित करते.
अनेक अभ्यासांनुसार, सफरचंदात फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक अॅसिड असतात. जे तुमच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ होण्यापासून वाचवतात. ज्यामुळे कर्करोगासारखे आजार होऊ शकतात.

सफरचंदाचा रस रोज प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहते. सफरचंदाचा रस तुमची पचनसंस्था स्वच्छ ठेवते. आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी आपण वेळोवेळी आपले शरीर डिटॉक्स केले पाहिजे. सफरचंदाचा रस प्यायल्याने शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात.

सालही फायदेशीर!

जर, आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर सफरचंद सालासमवेत खाण्याचा प्रयत्न करा. या फळाच्या सालीमध्ये ओरसोलिक आम्ल हा एक आवश्यक कंपाऊंड असतो, जो लठ्ठपणाशी लढायला मदत करतो. हे स्नायूची चरबी वाढवते आणि कॅलरी बर्न करण्यास मदत करते, त्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. आपण अक्खे सफरचंद किंवा ओट्समध्ये वैगरे घालून खाऊ शकता.

टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI