AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : झटपट वजन कमी करायचे? मग रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा!

जेंव्हा केंव्हा वजन कमी करण्याचा विषय येतो. तेंव्हा प्रत्येकवेळी वजन कमी करण्यासाठी कमी जेवण आणि व्यायाम याबद्दल बोलले जाते. मात्र, वजन कमी करण्यासाठी या केवळ दोनच गोष्टी पुरेशा नाहीत. वजन कमी करण्यासाठी आपल्याला जीवनशैलीमध्ये थोडा बदल करावा लागेल.

Weight Loss : झटपट वजन कमी करायचे? मग रात्री झोपण्यापूर्वी 'या' टिप्स नक्की फाॅलो करा!
लठ्ठपणा
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 8:39 AM
Share

मुंबई : जेंव्हा केंव्हा वजन कमी करण्याचा विषय येतो. तेंव्हा प्रत्येकवेळी वजन कमी करण्यासाठी कमी जेवण आणि व्यायाम याबद्दल बोलले जाते. मात्र, वजन कमी करण्यासाठी या केवळ दोनच गोष्टी पुरेशा नाहीत. वजन कमी करण्यासाठी आपल्याला जीवनशैलीमध्ये थोडा बदल करावा लागेल. रात्री झोपण्यापूर्वी आपण काही बदल करणे आवश्यक आहे.

रात्रीचे जेवण

बरेच लोक झोपायच्या आधी रात्रीचे जेवण करतात. मग सरळ अंथरुणावर जातात. पण ही सवय खूप वाईट आहे. रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान दोन तास अगोदर करा. रात्रीचे जेवण एकदम पोटभर करू नका. तसेच रात्रीच्या जेवणामध्ये उच्च कॅलरी अन्न घेऊ नका. कधीही रात्रीचे जेवण हलके आणि पचायला सोपे असले पाहिजे.

कार्बोहायड्रेट्स प्रमाण कमी करा

रात्रीच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी करा. रात्रीच्या जेवणामध्ये भात कमी खा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रात्रीच्या जेवनामध्ये शक्यतो ज्वारीच्या भाकरीचा समावेश करा.

जेवण झाल्यानंतर फिरा

रात्रीचे जेवण करा आणि थोडे फिरा. काही घरकाम करा. त्यामुळे अन्न चांगले पचते. चरबी बर्न होण्यास देखील मदत होते. मात्र, रात्रीचे जेवण झाल्यानंतर हळूहळू चाला. एकदम फास्ट चालू नका.

चयापचय महत्वाचे

वरील टिप्सचे पालन केल्याने तुमचे वजन झटपट कमी होण्यास मदत होईल. तसेच रात्रीच्या वेळी पचनास चांगले असे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. चयापचय क्रिया चांगली असेल तर तुमचे शरीर निरोगी राहते. वजन कमी करण्यासाठी चांगले चयापचय महत्वाचे आहे.

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला