हिवाळ्यात ‘या’ 5 प्रकारे तुमच्या आहारात पालकाचा करा समावेश, लोहाची कमतरता निघेल भरून
पालेभाजीतील पालक ही भाजी सहसा प्रत्येकालाच आवडते. पण हिवाळ्यात जास्त करून या भाजीचे सेवन केल्याने आपल्याला आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यात जर तुम्हाला पालक भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आजच्या लेखात आपण पालक भाजीचे हे 5 प्रकार बनवून तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.

पालक ही भाजी जवळजवळ प्रत्येक ऋतूत उपलब्ध असते. अशातच पालक ही पौष्टिक भाजी हिवाळ्यात एक उत्तम पालेभाजी आहे. ज्याचा आपल्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे. शरीर उबदार ठेवण्यासोबतच पालक ही लोहाचा एक उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे आपल्या शरीरात लोहाची कमतरता भरून निघते. पण अनेकवेळा मुलं पालक भाजी खाण्यास विरोध करतात. तर आजच्या लेखात आपण पालक भाजी तुम्ही मुलांच्या आहारात कशा प्रकारे समाविष्ट करू शकतात ते जाणून घेऊयात.
डाळ पालक भाजी : वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींमध्ये तुम्ही पालक भाजी घालून डाळ पालक अशी एक डिश बनवू शकता. डाळ पालक ही भाजी खूप चविष्ट बनते. अशा प्रकारे तुम्हाला लोह आणि प्रथिने दोन्ही मिळतील, कारण डाळींमध्ये प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. यामुळे डाळीची चव देखील वाढते.
पालक चिल्ला : तुम्ही नाश्त्यामध्ये पालक चिल्ला बनवू शकता. यासाठी पालक प्युरी करून ते बेसन आणि रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही पीठ तयार करू नका. आता एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून पसरवा आणि तयार पिठ टाका आणि चिल्ला बनवू शकता. हा नाश्त्याचा एक उत्तम पर्याय आहे. तसेच यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यां मिक्स करून चिल्ला बनवू शकता.
पालक पराठा : तुम्ही पालक पराठा बनवू शकता तेही खूप कमी तेलात बनवू शकता. जर तुम्हाला हवे असल्यास पालकची भाजी करून पोळीच्या गोळ्यात स्टफ करून त्यानंतर पोळी लाटून पराठा तयार करू शकता. किंवा पालक बारीक वाटून यापासून पालकाच्या प्यूरीच्या साहाय्याने पीठ मळून घ्या आणि पीठापासून पराठा बनवू शकता तुम्ही दुपारच्या जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी पालक पराठा खाऊ शकता.
पालक सूप : हिवाळ्यातील आरामदायी जेवणाचा विचार केला तर सूप हा एक उत्तम पर्याय आहे. हिवाळ्यात तुम्ही पालक सूप बनवू शकता. त्यात जास्त तेल वापरले जात नाही आणि मसाले मर्यादित असतात, त्यामुळे पालक खाण्याचा हा एक उत्तम आणि आरोग्यदायी मार्ग बनतो.
पालक पनीर : पालक पनीर हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते आणि ते अनेकदा खास प्रसंगी बनवले जाते. तथापि ते तयार करताना क्रीम, बटर किंवा जास्त तेल टाळावे. यामुळे फॅटचे प्रमाण वाढते जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
