मोठी बातमी! राज ठाकरेंच्या सर्वात जवळचा नेता मनसेला ठोकणार रामराम? पक्षात मोठा भूकंप?
मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बडा नेता राज ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची चर्चा असून, त्यामुळे आता मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, महाराष्ट्रातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका होणार आहे, मात्र सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे, मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती आणि शिवसेना ठाकरे गट , मनसे यांच्या युतीसाठी अत्यतं प्रतिष्ठेची मानली जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये यावेळी पहिल्यांदाच नवा प्रयोग पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती झाली आहे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले आहेत. तसेच मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यासोबत मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटानं देखील युती केली आहे.
त्यामुळे यंदा मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट, मनसे युती आणि भाजप -शिवसेना युतीमध्ये प्रमुख लढत असणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळणार आहे. दरम्यान त्यापूर्वी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मनसेनं शिवसेना ठाकरे गटासोबत युती केल्यानंतर आता मनसेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी राजीनामा दिला होता, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तर आता मनसेला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तो म्हणजे मनसेचे नेते संदीप देशपांडे हे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर संदीप देशपांडे यांनी राजीनामा दिला तर तो पक्षासाठी मोठा धक्का असणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार संदीप देशपांडे हे महापालिका निवडणूक झाल्यानंतर मनसेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्याकडून संदीप देशपांडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. जागा वाटपात विश्वासात घेतलं नसल्यानं संदीप देशपांडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर ते राजीनामा देण्याची शक्यता आहे.
