Health care : यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!

यकृताची आपल्या शरीरात एक विशेष भूमिका असते. हे शरीरातील अन्न पचवण्यापासून पित्त बनविण्यापर्यंत कार्य करते. याशिवाय यकृत शरीरात प्रथिने बनविण्याचे, साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे आणि शरीरात डिटॉक्सिफाय करण्याचेही काम करते.

Health care : यकृत निरोगी ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा!
हेल्दी आहार
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 7:13 AM

मुंबई : यकृताची आपल्या शरीरात एक विशेष भूमिका असते. हे शरीरातील अन्न पचवण्यापासून पित्त बनविण्यापर्यंत कार्य करते. याशिवाय यकृत शरीरात प्रथिने बनविण्याचे, साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे आणि शरीरात डिटॉक्सिफाय करण्याचेही काम करते. त्यामुळे यकृत निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. जर यकृत निरोगी असेल तर आपले संपूर्ण शरीर योग्य प्रकारे कार्य करते. यकृत तंदुरूस्त ठेवण्यासाठी नेमके कोणते पदार्थ फायदेशीर आहेत, हे आज आपण बघूयात. (Include these foods in your diet to keep your liver healthy)

पपई आरोग्यासाठी खूप चांगली आहे, हे सर्वांना ठावूक आहे. पपई नियमितपणे खाण्याने शरीराला बरेच फायदे होतात. बरेच लोक आपल्या आहारात नियमितपणे पपईचा समावेश करतात. पपईत खनिज, पोषक तत्व आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. पपईमध्ये असलेले व्हिटामिन c, व्हिटामिन E आणि बीटा क्यारोटीनसारखे अँटी ऑक्सिडंट असतात. पपई खाल्ल्याने आपले यकृत तंदुरूस्त राहण्यास मदत होते.

लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबू सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते. त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषांपासून मुक्तता मिळू शकते. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. थकवा दूर करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबाचा उपयोग केला जातो. आपल्या दररोजच्या जेवनामध्ये लिंबाचा समावेश करा. यामुळे आपले यकृत तंदुरूस्त राहण्यास मदत होते.

क्रॅनबेरी आणि ब्लुबेरी सारख्या बेरीजमध्ये अँथोसायनिन असतो जो यकृतला कुठल्याही प्रकारच्या आजारापासून वाचवतो. हे अँटीऑक्सिडंट लिव्हरच्या रोगप्रतीकारक शक्तीलाही मजबूत ठेवण्याचं काम करतं. लसूनमध्ये अ‍ॅलिसिन कंपाऊंड असतं जे पूर्ण बॉडीला डिटॉक्स करण्याचं काम करतं. लसूनमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक गुणंही असतात. हे लिव्हरला स्वच्छ आणि मजबूत बनवतं. कोथिंबिर, हळद, आलं आणि सिंहपर्णीची मुळं ही शक्तीशाली डिटॉक्सिफायर मानले जातात. या सर्व औषधी वनस्पती यकृतला मजबूत बनवण्याचं काम करतात.

दररोज दुपारी जेवणासोबत ताक घेण्याची सवय लावा. ताकात हिंग, मीठ, भाजलेले जिरे आणि मिरपूड घालून प्या. यकृत दुरुस्त करण्याबरोबरच ताक आपल्या पोटातील पचन प्रणाली सुधारते. उन्हाळ्यात ताक घेणे हे वरदान असल्यासारखे आहे. ग्रीन टी मध्ये अशी काही संयुगे असतात, जी यकृतातील जळजळ कमी करण्यासाठी आणि पाचन तंत्राला आराम देण्याचे काम करतात. म्हणून, यकृत निरोगी राहण्यासाठी, चहाऐवजी ग्रीन टीला आपल्या रुटीनचा भाग बनवा. बीट हा एक अतिशय शक्तिशाली डिटॉक्स मानला जातो. तसेच खराब झालेले यकृत रिकव्हर करण्याची शक्ती देखील यात आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include these foods in your diet to keep your liver healthy)

Non Stop LIVE Update
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा.
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.