AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cheela Recipe : निरोगी राहण्यासाठी नाश्त्यामध्ये दुधी भोपळ्याचा चीला खा, जाणून घ्या रेसिपी!

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, निरोगी राहण्यासाठी आणि वाढलेले वजन कमी (Weight loss) करण्यासाठी हेल्दी आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करणे आवश्यक मानले जाते, हिरव्या भाज्यांमध्ये (Vegetables) असलेले फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरासाठी (Body) फायदेशीर असतात.

Cheela Recipe : निरोगी राहण्यासाठी नाश्त्यामध्ये दुधी भोपळ्याचा चीला खा, जाणून घ्या रेसिपी!
चीला खाणे आरोग्यासाठी फायदेशीर Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 13, 2022 | 10:41 AM
Share

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, निरोगी राहण्यासाठी आणि वाढलेले वजन कमी (Weight loss) करण्यासाठी हेल्दी आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करणे आवश्यक मानले जाते, हिरव्या भाज्यांमध्ये (Vegetables) असलेले फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरासाठी (Body) फायदेशीर असतात. म्हणून तज्ज्ञ सांगतात की, एका दिवसामध्ये किमान दोन हिरव्या भाज्याचे सेवन करायला हवेच. विशेष म्हणजे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तर निरोगी राहण्यासाठी आपण दुधी भोपळ्याचे नक्कीच सेवन करायला हवे.

दुधी भोपळ्याचा चीला

दुधी भोपळ्यामुळे आपले शरीर हे हायड्रेट राहण्यास मदत होते. मात्र, दुधी भोपळ्याची भाजी असो किंवा सूप असो जास्त करून कोणालाही खाण्यासाठी आवडत नाही. मग अशावेळी खास आपण दुधी भोपळ्यापासून चीला तयार करून आहात घेतला पाहिजे. चला जाणून घेऊयात चिल्याची रेसिपी.

साहित्य

किसलेला दुधी भोपळा एक कप, 200 ग्रॅम बेसन, दही, रवा, लाल तिखट, हिरवी मिरची, मीठ, आले, लसूण, हिरवी कोथिंबीर, तेल इत्यादी साहित्य आपल्याला लागेल.

तयार करण्याची पध्दत

चीला तयार करण्यासाठी एका भांड्यात किसलेला दुधी भोपळ्याचा गर घ्या. आता त्यात बेसन घालून थोडा वेळ ढवळून घ्या. या पिठात सर्व मसाले आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. पिठात आले-लसूण पेस्ट घाला. त्यानंतर सर्व मिश्रण एकत्र व्यवस्थित मिक्स करा. चिरलेली कोथिंबीर घातल्यानंतर पॅन गरम करून त्यात तेल टाका आणि हे मिश्रण चांगले पसरवा. आता दोन्ही बाजूने चीला बेक करा आणि मस्त गरमा-गरम सर्व्ह करा.

संबंधित बातम्या :

दररोज सकाळी जिमला जाण्याचा येतो कंटाळा? मग हे उपाय करा आणि घरीच आपले वजन कमी करा!

Skin Care : महागड्या उत्पादनांपेक्षा कोरफडचा अशाप्रकारे वापर करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.