Health Tips For Women :’ही’ जीवनसत्वे आणि खनिजे महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक, वाचा याबद्दल सविस्तर!

वाढत्या वयाबरोबर महिलांनी त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये व्हिटॅमिन आणि पोषक तत्वांची कमतरता अधिक असते. याचे मुख्य कारण हार्मोन्समधील बदल, गर्भधारणा आहे. त्वचा, केस आणि हाडांशी संबंधित समस्या स्त्रियांमध्ये अधिक सामान्य असल्याचे सांगितले जाते.

Health Tips For Women :'ही' जीवनसत्वे आणि खनिजे महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक, वाचा याबद्दल सविस्तर!
आहार
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Oct 03, 2021 | 7:25 AM

मुंबई : वाढत्या वयाबरोबर महिलांनी त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये व्हिटॅमिन आणि पोषक तत्वांची कमतरता अधिक असते. याचे मुख्य कारण हार्मोन्समधील बदल, गर्भधारणा आहे. त्वचा, केस आणि हाडांशी संबंधित समस्या स्त्रियांमध्ये अधिक सामान्य असल्याचे सांगितले जाते. बऱ्याचदा स्त्रिया पाठ आणि पाय दुखण्यासारख्या समस्यांनी त्रस्त असतात. स्त्रियांना निरोगी राहण्यासाठी कोणत्या जीवनसत्त्वांची गरज आहे ते जाणून घेऊया. (These vitamins and minerals are essential for women’s health)

व्हिटॅमिन डी

वाढत्या वयाबरोबर स्त्रियांना हाडांशी संबंधित समस्या निर्माण होतात. हाडे निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सर्वात महत्वाचे आहे. आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृध्द अन्न समाविष्ट करण्याची गरज आहे. मशरूम, दूध, चीज, सोया, अंडी, लोणी, ओटस, यासारखे पदार्थ व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम समृध्द असतात.

व्हिटॅमिन ई

फिटनेसबरोबरच महिलांना त्यांच्या सौंदर्याचीही काळजी घ्यावी लागते. प्रत्येक स्त्री दीर्घकाळ तरुण आणि सुंदर दिसण्याचा प्रयत्न करते. यासाठी व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आवश्यक आहे. आपली त्वचा, केस आणि नखे सुंदर करण्यासाठी व्हिटॅमिन ई आवश्यक आहे. व्हिटॅमिन ई देखील सुरकुत्या आणि डाग दूर करण्यास मदत करते. बदाम, शेंगदाणे, लोणी आणि पालक सारखे पदार्थ व्हिटॅमिन ईने समृद्ध असतात.

व्हिटॅमिन बी 9

गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. गर्भधारणेदरम्यान शरीराला अधिक जीवनसत्त्वे आवश्यक असतात. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे बाळाच्या जन्मादरम्यान अनेक समस्या उद्भवू शकतात. गर्भधारणेदरम्यान, स्त्रियांनी बीन्स, धान्य, यीस्ट इत्यादी पदार्थांचे सेवन केले पाहिजे, जे व्हिटॅमिन बी 9 मध्ये समृद्ध आहेत. फोलिक अॅसिड बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी मदत करते.

व्हिटॅमिन ए

महिलांमध्ये 40 ते 45 वयामध्ये हार्मोनल बदल होतात. या वयात महिलांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत त्वचेमध्ये अनेक प्रकारचे बदल घडू शकतात. म्हणून, यावेळी महिलांनी गाजर, पपई, भोपळ्याचे बियाणे आणि पालक सारख्या व्हिटॅमिन ए समृद्ध पदार्थांचा समावेश करावा.

व्हिटॅमिन K

काही स्त्रियांचे मासिक पाळी दरम्यान भरपूर रक्त जाते. यामुळे व्हिटॅमिन के शरीरासाठी आवश्यक आहे. हे रक्त कमी होण्याची समस्या टाळण्यास मदत करते. अशा परिस्थितीत सोयाबीन तेल आणि हिरव्या भाज्या आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(These vitamins and minerals are essential for women’s health)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें