‘पेट’से हिंदुस्थानी : ना पिझ्झा, ना बर्गर; भारतीयांची ‘या’ खाद्यपदार्थाला सर्वाधिक पसंती!

स्विगी या फूड डिलीव्हरी कंपनीच्या अहवालानुसार, देशात सर्वाधिक ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थात बिर्याणीनं नंबर एक कायम ठेवला आहे. यंदाच्या वर्षी ‘स्विगी’कडे प्रति मिनिटाला 115 बिर्याणी ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. तर मिठाईमध्ये गुलाबजामला भारतीयांनी प्राधान्य दिले. त्यानंतर रसमलाईची ऑर्डर नोंदविली गेली. स्विगीवर पावभाजीच्या 21 लाख ऑर्डर नोंदविल्या गेल्या.

‘पेट’से हिंदुस्थानी : ना पिझ्झा, ना बर्गर; भारतीयांची ‘या’ खाद्यपदार्थाला सर्वाधिक पसंती!
Food
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 10:01 PM

नवी दिल्ली : नवं वर्ष उजाडण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सरत्या वर्षात खाद्यजगतात घडलेल्या घडामोडींचा मागोवा घेण्यात आला आहे. भारतातील आघाडीची ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी ‘स्विगी’नं भारतीयांचं रिपोर्ट कार्ड जारी केलं आहे. ग्राहकांच्या वर्षभरातील डिलिव्हरींचे विश्लेषण करुन कंपनीने अहवाल तयार केला आहे. सर्वाधिक पसंतीच्या स्नॅक्सच्या यादीत समोसा टॉप ठरला आहे. (which Food India ordered most in 2021 read Swiggy report)

गेल्या सहा वर्षांपासून ‘स्विगी’द्वारे डिलिव्हरी ऑर्डरचे संख्याशास्त्रीय विश्लेषण केले जाते. ‘स्विगी’ने यावर्षीच्या डिलिव्हरी ऑर्डरचा विश्लेषणात्मक अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. स्विगी फूड डिलिव्हरी, इन्स्टामार्टवर किराणा, स्विगी जेनी आणि हेल्थहब वर पिक-अप आणि ड्रॉप सेवा यासारख्या सर्व सेवांसाठी प्राप्त ऑर्डरनुसार अहवाल बनविण्यात आला आहे.

‘स्विगी’ अहवालाची टॉप-12 वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

  • वर्ष 2021 मध्ये सर्वाधिक ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थात बिर्याणीनं नंबर एकवर कायम आहे.
  • ‘स्विगी’ला भारतभरातून वर्षभरात प्रति मिनिट 115 बिर्याणी ऑर्डर प्राप्त झाल्या.
  • मिठाई किंवा गोड पदार्थाच्या ऑर्डर डिलिव्हरीत गुलाबजामने बाजी मारली आहे.
  • भारतीयांनी गुलाबजामनंतर रसमलाईची सर्वाधिक वेळा ऑर्डर नोंदविली.
  • स्विगीवर पावभाजीच्या वर्षभरात 21 लाख ऑर्डर नोंदवल्या गेल्या.
  • स्विगीच्या अहवालात ग्राहकांच्या ऑर्डरच्या वेळेचा देखील विचार करण्यात आला आहे.
  • रात्री दहा वाजेनंतर सर्वाधिक ऑर्डर गार्लिक ब्रेडची नोंदविण्यात आली आहे. त्यासोबतच पॉपकॉर्न, फ्रेंच फ्राईज यांनाही ग्राहकांनी पसंती दिली आहे.
  • ग्राहकांनी ‘स्विगी’वर संध्याकाळी सात ते नऊ वाजेदरम्यान सर्वाधिक ऑर्डर दिल्या. स्विगीने सात ते नऊ ही कंपनीसाठी सर्वाधिक व्यस्त वेळ असल्याचे म्हटले आहे.
  • स्विगीच्या अहवालानुसार, बंगळुरु आरोग्याबाबत सजग असलेले पहिल्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. बंगळुरुनंतर हैदराबाद आणि मुंबईची वर्णी लागली आहे.
  • सर्वाधिक डोसा ऑर्डर करण्याच्या यादीत बंगळुरु क्रमांक एकचं शहर ठरलं आहे.
  • स्विगीच्या अहवालात चैन्नई सर्वात उदार शहर ठरलं आहे. स्विगी डिलिव्हरी पार्टनरला एका ऑर्डरसाठी 6,000 रुपयांची टिप दिली गेली.
  • आरोग्यदायी खाद्यपदार्थ (हेल्दी फूड) सर्च करण्याचे प्रमाण यंदाच्या वर्षी दुप्पटीने वाढले आहे. अशा प्रकारच्या रेस्टॉरंटच्या ऑर्डरमध्ये 200% वाढ दिसून आली आहे.

इतर बातम्या

पनीरची भाजी खाऊन कंटाळलायत? मग, घरच्या घरी बनवा झटपट पनीर फ्राइड राईस!

प्रेग्नेंट आहात तर मग सावधान… चुकूनही खाऊ नका ‘ही’ फळं, मग कोणती फळं खाण्यासाठी योग्य?

ख्रिसमसची लगबग, टीव्ही9 कडून ख्रिसमसचं खास गिफ्ट, घरच्या घरी बनवा खास ड्रायफ्रूट केक

(which Food India ordered most in 2021 read Swiggy report)

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.