Weight Loss Tips : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर ‘या’ 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!

जरी व्यायाम केल्याने थकवा जाणवत असेल तरी देखील व्यायाम करणे आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी खूप आवश्यक आहे. संध्याकाळी किंवा पहाटे फिरायला थोडा वेळ घ्या. दररोज व्यायाम, योगा आणि ध्यान करा. यापैकी आपण काहीही करू शकत नसतोल तर घरातील कामे उत्साहाने करा.

Weight Loss Tips : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर 'या' 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!
लठ्ठपणा

मुंबई : आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. परंतू वजन कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत. हे अनेकांना कळत नाही. त्याच प्रकारे वजन कमी करताना आपण अनेक प्रकारच्या चुका देखील करतो. त्याचे नुकसान आपल्याला सहन करावे लागते. (While losing weight Remember these 4 important things)

अधिक सक्रिय व्हा

जरी व्यायाम केल्याने थकवा जाणवत असेल तरी देखील व्यायाम करणे आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी खूप आवश्यक आहे. संध्याकाळी किंवा पहाटे फिरायला थोडा वेळ घ्या. दररोज व्यायाम, योगा आणि ध्यान करा. यापैकी आपण काहीही करू शकत नसतोल तर घरातील कामे उत्साहाने करा.

हायड्रेशन

आपले शरीर 70 टक्के पाण्याने बनलेले आहे. आपल्या सर्वांना हे माहित आहे की, शरीरात पाण्याअभावी आरोग्यावर वाईट परिणाम होतो. एवढेच नव्हे तर त्वचेची समस्याही वाढते. पावसाळ्यात घाम आणि आर्द्रतेमुळे शरीर पटकन डिहायड्रेट होते. दिवसातून 7 ते 8 ग्लास पाणी प्या आणि शरीराला हायड्रेट ठेवा. वजन कमी करण्यासाठी देखील पाणी खूप आवश्यक आहे. यामुळे वजन कमी करण्यासाठी जास्तीत-जास्त पाणी प्या.

पुरेसे फळे खा

फळे तुम्हाला भरपूर ऊर्जा देतात. वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये फळांचा समावेश करणे आवश्यक आहे. बहुतेक फळांमध्ये कॅलरीज कमी असतात. ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी असतो.

नाश्ता करणे टाळू नका

अनेकांचा असा विश्वास आहे की नाश्ता वगळल्यास वजन लवकर कमी होण्यास मदत होते. मात्र, जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्न करत असाल तर नाश्ता करणे बंद करू नका. अन्यथा त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. एक निरोगी आणि हलका नाश्ता तुम्हाला दिवसभर उत्साही राहण्यास मदत करतो.

हिरव्या भाज्या

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात जास्तीत-जास्त प्रमाणात हिरव्या भाज्या घ्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तसंच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात.

संबंधित बातम्या : 

Skin Care : चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे दूर करण्यासाठी दररोज सकाळी मध, लिंबू आणि लसूण खा!

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(While losing weight Remember these 4 important things)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI