हॉटेलमधील शेफसारखं रुचकर जेवण बनवायचं? गृहिणींसाठी खास किचन टिप्स

हॉटेलमधील शेफ वापरत असलेल्या स्वयंपाकाच्या टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Chef Kitchen Tips for women)

हॉटेलमधील शेफसारखं रुचकर जेवण बनवायचं? गृहिणींसाठी खास किचन टिप्स
खास किचन टिप्स

मुंबई : हॉटेलमधील काही पदार्थांची चव नेहमीच आपल्या जिभेवर रेंगाळत असते. पण तेच पदार्थ घरी बनवले तर ते रेस्टॉरंटसारखे बनत नाही. अनेकदा काही गृहिणी एखादा पदार्थ युटयूबवर बघून ट्राय करतात. पण त्याचीही चव हॉटेलातील पदार्थासारखी येत नाही. (Chef Kitchen Tips for women make delicious meal like hotel)

हॉटेलमध्ये नेमकं काय साहित्य वापरतात? ते जेवणात कोणता मसाला वापरतात? मग मी तो वापरल्यावरही माझी ग्रेव्ही अशी का झाली? असे एक ना हजार प्रश्न आपल्याला पडतात. पण हॉटेलमधील शेफ वापरत असलेल्या स्वयंपाकाच्या टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे तुम्हीही हॉटेलप्रमाणे रुचकर जेवण बनवू शकता.

गृहिणींसाठी खास किचन टिप्स

1. दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे तीन किंवा चार देठ टाकावेत. त्यामुळे दही घट्ट लागते. मिरचीच्या देठात enzymes नावाचा घटक असतो. त्यामुळे दही घट्ट होते.

2. डाळ माखनी बनवताना काळ्या उडीदाची अख्खी डाळ वापरावी. ती कमीत कमी 7 ते 8 वेळा धुवून भिजत ठेवावीत. यानंतर ती डाळ न धुता शिजवा. त्यामुळे डाळीला विशिष्ट चव येते.

3. बिर्याणी, डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला, तर त्याला छान टेस्ट येते. यासाठी बिर्याणी, डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या. त्यात 2/3 लवंग आणि 1 टिस्पून तूप कोळशावर टाका. त्यानंतर घट झाकून ठेवा. त्यामुळे 3 ते 4 मिनिटात मस्त स्मोकी फ्लेवर येईल.

4. हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो. अनेकदा भाजी शिजवताना भाज्यांचा हिरवा रंग निघून जातो. त्यामुळे या भाज्या शिजवताना एक टिस्पून खाण्याचा सोडा टाकावा. त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकण ठेवून शिजवू नये.

5. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते. मात्र लसून पटकन सोलण्यासाठी ते 1 मिनिटं ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एका घट्ट झाकण्याच्या डब्यात घालून जोरात हलवा. त्यामुळे लसूणाच्या पाकळ्या निघून जातील.

6. शेंगदाणे ओव्हनमध्ये छान भाजले जातात. एका विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजा. त्यामुळे चांगली चव येते.

7. जर घरात expiry झालेले टोमॅटो केचअप असेल, तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना लावून ठेवा. त्यामुळे ते चकाकतील. (Chef Kitchen Tips for make delicious meal like hotel)

8. सफरचंद कापले ऑक्सिडेशन रिअॅक्शनमुळे ते काळे पडतात. त्यामुळे सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावा. त्यामुळे ते काळे पडणार नाही. सॅलड करताना ही टीप नक्की वापरावी.

10. जैन जेवण बनवताना कांदा किंवा लसूणचा वापर करता येत नाही. त्यामुळे जैन जेवण चविष्ट बनवण्यासाठी ओवा आणि हिंगाचा तडका द्या. जेवण हॉटेलसारखे टेस्टी होईल.

11. भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते. ते पुन्हा वापरता येत नाही. अशावेळी थोडा शिजलेला भात त्या गरम तेलात घालावा. त्यामुळे तेलाचे काळे  कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते.

12. छोटे- भटूरे करतेवेळी भटूरचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करुन टाकावा. त्यामुळे भटूरे छान फुगतात आणि मऊ राहतात.

13. अनेकदा आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो. पण जर तुम्ही कडधान्य भिजत घालायला विसरला असाल, तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घालावा.

14. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते. यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाकावे. त्यामुळे मीठ मोकळे राहते.

15. काजू, बदाम, अक्रोड भाजून थंड करुन हवाबंद बरणीत ठेवा. त्यामुळे ते खवट होणार नाही. तसेच ते कडक राहतील.  (Chef Kitchen Tips for make delicious meal like hotel)

संबंधित बातम्या : 

गूळ खाणे आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर, मिळेल नैसर्गिक चमक!

मसालेदार अन्न केवळ नुकसानदायीच नाही! हे फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI