Health Tips | जाणून घ्या, चिमूटभर हळदीचे लाभदायक फायदे

त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील हळदीचा वापर केला जातो. या बहुगुणी हळदीचा वापर फक्त स्वयंपाक घरापर्यंत मर्यादित नसून त्वचेमध्ये नैर्सगिकरित्या सुंदरता आणण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.

Health Tips | जाणून घ्या, चिमूटभर हळदीचे लाभदायक फायदे
जाणून घ्या, चिमूटभर हळदीचे लाभदायक फायदे
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 6:56 PM

मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये हळदीला (turmeric) अनन्यसाधारण महत्व आहे. ग्रंथ आणि पुराणांमध्ये आपल्याला हळदीचे महत्व पाहायला मिळते. हळदीमध्ये मुबलक प्रमाणात करक्यूमिन अँटी ऑक्सिडेंट असते. आज आपण हळदीचे काही गुणधर्म जाणून घेणार आहोत. हळदीचा वापर जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये केला तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला आढळून येतील. हळदीच्या वापरामुळे जेवण स्वदिष्ट बनते. साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी आपण हळदीचा वापर करतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील हळदीचा वापर केला जातो. या बहुगुणी हळदीचा वापर फक्त स्वयंपाक घरापर्यंत मर्यादित नसून त्वचेमध्ये नैर्सगिकरित्या सुंदरता आणण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. (Know the beneficial benefits of a pinch of turmeric)

संर्सगजन्य आजारांपासून लांब राहण्यासाठी (To get rid of infectious diseases)

हळदीमध्ये (turmeric)मोठ्या प्रमाणात दाहक-विरोधी (anti-inflammatory), प्रतिजैविक (अँटी माइक्रोबियल) आणि अँटीवायरल असे गुण असल्याने हळद ही एक उत्तम रोगप्रतिबंधक आहे. यासाठी एक कप दुधामध्ये चिमूटभर हळद मिळवा. सर्दी, गळ्याची खवखव या सर्वांवर हा रामबाण उपाय होऊ शकतो.

जखमा भरण्यासाठी

आयुर्वेदामध्ये हळदीचे अनेक उपयोग सांगितले आहे. जर तुम्हाला कुठे जखम झाली असेल तर हळद हा सर्वात उत्तम उपाय आहे. जखमेवर हळद लावल्यास ती जखम लवकर बरी होण्यास मदत होईल. या बरोबरच इन्फेक्शन होण्याची भीती ही पूर्णपणे निघून जाते.

खताच्या स्वरुपात वापर

झाडांवर पडणाऱ्या किडींवर उपाय म्हणून हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. हे घरगुती खत आपण अतिशय सोप्या पद्धतीने तयार करु घरीच पाण्यामध्ये करू शकतो.

क्षणात मिळवा केसांच्या समस्येपासून मुक्तता (To get rid of hair Problem)

जर तुम्ही केसात होणाऱ्या कोंड्यापासून त्रस्त असाल तर त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. यासाठी एक चमचा हळदीमध्ये ऑलिवचे तेल मिसळून यापासून तयास झालेल्या मिश्रणाला केसांवर लावा आणि 20 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. डोक्यातील कोंडापासून मुक्त होण्यासाठी सौम्य शॅम्पू वापरा आणि तुम्हाला काही दिवसात फरक दिसेल.

त्वचेची जळजळ दूर करते

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे त्वचेमध्ये होणारी जळजळ दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला 2 चमचे एलोवेरा जेलमध्ये हळद मिसळावी लागेल. हे मिश्रण जळत्या भागावर लावा आणि काही काळ सोडा. त्वचेचे जळजळ दूर करण्यासाठी तुम्ही हे मिश्रण वापरू शकता. (Know the beneficial benefits of a pinch of turmeric)

(कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या )

नाशिकमध्ये 940 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; एकट्या सिन्नरमध्ये 198 जण

PHOTO | परिणीती चोप्राने शेअर केले मालदीव ट्रिपमधील फोटो, स्पोर्ट्स ब्रामध्ये दिसली अभिनेत्री

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.