AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरच्या घरी शेवग्याच्या शेंगांपासून बनवा लोणचे, झटपट जाणून घ्या रेसिपी

शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात. तुम्ही शेवग्याच्या शेंगांची आमटी तर अनेकदा बनवली असेल, पण त्यापासून लोणचे देखील बनवता येत... तर जाणून घ्या घरच्या घरी शेवग्याच्या शेंगांपासून लोणचे बनवण्याची रेसिपी...

घरच्या घरी शेवग्याच्या शेंगांपासून बनवा लोणचे, झटपट जाणून घ्या रेसिपी
| Updated on: Apr 22, 2026 | 6:44 PM
Share

शेवग्याची शेंग आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांसाठी शेवग्याची शेंग अत्यंत लाभदायक आहे. शेवग्याची शेंग हाडांची मजबूती, मधुमेह नियंत्रण, पचन सुधारणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि यकृत/मूत्रपिंड शुद्ध करण्यासाठीअ त्यंत फायदेशीर आहे. अनेक जण त्यांच्या आहाराच शेवग्याच्या शेंगाचा समावेश करतात. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, आंबा किंवा लिंबाप्रमाणेच शेवग्याच्या शेंगांपासून लोणचे बनवता येते. अनेक औषधी गुणधर्म असलेल्या शेवग्याच्या शेंगांचा लोणच्याच्या स्वरूपात वापर केल्याने पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. शेवग्याच्या शेंगांचे लोणचे कसे बनवायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर शेवग्याच्या शेंगांपासून लोणचे बनवण्याची रेसिपी फार सोपी आहे.

लोणच्याचे अनेक प्रकार आहेत. पण तुम्ही शेवग्याचे लोणचे बनवू शकता का? शेवगा ही केवळ एक भाजी नाही, तर ते एक सुपर फूडसुद्धा आहे. आपण सहसा सांबार आणि आमटीमध्ये शेवग्याचा वापर करतो. पण आंबा किंवा लिंबाप्रमाणेच, तुम्ही शेवग्याचे स्वादिष्ट लोणचेसुद्धा बनवू शकता. तर जाणून घ्या अगदी सोप्या आणि स्वादिष्ट पद्धतीने शेवग्याच्या शेंगांपासून लोणचे तयार करण्याची रेसिपी….

शेवग्याच्या शेंगापासून लोणचे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

शेवग्याच्या शेंगा

मोहरीची पावडर – 3 चमचे

लाल मिरची पावडर – 2 चमचे

हळद पावडर – 1/2 चमचा

मेथी – 1 चमचा

बडीशेप – 1/2 चमचा

कायम – 2 चिमटे

व्हिनेगर – 1 चमचा

तेल, मीठ – आवश्यकतेनुसार

शेवग्याच्या फोडी पाण्यात 5 मिनिटे उकळून पाणी काढून टाका. नंतर, एका काचेच्या बरणीत मोहरीची पूड आणि मीठ घालून, त्यात शेवगा कोमट पाण्यात ठेवा आणि 3 दिवसांसाठी बंद करून ठेवा. तीन दिवसांनी, जेव्हा लोणचे आंबट होईल, तेव्हा फोडी बाहेर काढून, धुवून 3-4 तास उन्हात वाळवा.

त्यानंतर एका कढईत तेल गरम करा, त्यात भाज्या घाला आणि गॅस बंद करा. तेल थंड झाल्यावर त्यात मोहरी, मेथी, हळद आणि इतर मसाले घालून एकत्र करा. त्यात सुक्या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे, व्हिनेगर आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळा. तयार झालेले लोणचे वापरण्यापूर्वी 2 – 3 दिवस काचेच्या बरणीत साठवून ठेवता येते. हे भात किंवा चपातीसोबत खायला खूप चविष्ट लागते.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?