देवाच्या पूजेसाठीच नव्हे तर, आरोग्याच्या गंभीर समस्यांवर लाभदायी ‘झेंडू’, वाचा याचे फायदे…

झेंडूचे फूल केवळ देवाच्या पूजेसाठीच उपयुक्त ठरत नाही, तर त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे बर्‍याच गंभीर रोगांशी लढण्यासाठी प्रभावी आहेत.

देवाच्या पूजेसाठीच नव्हे तर, आरोग्याच्या गंभीर समस्यांवर लाभदायी ‘झेंडू’, वाचा याचे फायदे...
झेंडूचे फूल केवळ देवाच्या पूजेसाठीच उपयुक्त ठरत नाही, तर त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे बर्‍याच गंभीर रोगांशी लढण्यासाठी प्रभावी आहेत.

मुंबई : झेंडूचे फूल केवळ देवाच्या पूजेसाठीच उपयुक्त ठरत नाही, तर त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे बर्‍याच गंभीर रोगांशी लढण्यासाठी प्रभावी आहेत. झेंडूच्या फुलांमध्ये असलेले अँटी-फंगल, अँटी-एलर्जीक आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म कर्करोग आणि ट्यूमर सारख्या गंभीर आजारांमुळे होणार्‍या त्वचेच्या सर्व समस्यांवर उपचार करण्यास मदत करतात. चला तर त्याच्या औषधी गुणधर्मांबद्दल जाणून घेऊया…(Marigold flower benefits from skin problems to serious disease)

झेंडूच्या फुलाचे औषधी उपयोग :

– अनेक संशोधनात असे आढळले आहे की, झेंडूच्या फुलात, मुळात आणि पानांमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त, हे ट्यूमरच्या वाढीस देखील प्रतिबंधित करते. अशावेळी, झेंडूची फुले, देठ आणि पाने यांचा काढा करून सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्याने खूप आराम मिळतो.

– डाग, खाज आणि नायटा यामुळे उद्भवलेल्या त्वचेच्या समस्यां, तसेच त्यामुळे आलेले डाग काढून टाकण्यात झेंडूचे फूलं खूप फायदेशीर ठरतात. यासाठी झेंडूच्या फुलांना वाटून त्यांची पेस्ट तयार करा आणि झेंडूच्या पानांचा रस काढून दोन्ही गोष्टी चांगल्या एकत्र मिसळा. समस्या असलेल्या ठिकाणी ही पेस्ट लावा. चार ते पाच दिवस नियमित हा उपाय केल्याने समस्या दूर होईल. याशिवाय झेंडूची पाने पाण्यात उकळा आणि पाणी थंड करा आणि समस्या असलेल्या ठिकाणी लावा. यामुळे आरामही मिळेल (Marigold flower benefits from skin problems to serious disease).

– झेंडूची फुले तापातही फायदेशीर ठरतात. त्याचा चहा पिण्यामुळे ताप, थंडी, थरथरी यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते.

– स्त्रियांना श्वेत प्रदाराची समस्या असल्यास झेंडूच्या फुलांचा 5  ते 10 ग्रॅम रस सेवन केल्यास फायदेशीर ठरते.

– मुतखड्याच्या समस्येमध्ये झेंडूची पानेही खूप उपयुक्त आहेत. यासाठी झेंडूच्या पानांचा एक काढा बनवून सकाळी आणि संध्याकाळी सेवन केल्याने मूतखडे विरघळतात आणि काही दिवसांत बाहेर येतात.

– मुळव्याधीचा त्रास असल्यास झेंडूची फुले आणि पाने फार चांगले काम करतात. यासाठी दहा ग्रॅम पाने, दोन ग्रॅम मिरपूड घेऊन त्यांना बारीक वाटून रुग्णाला द्यावे, त्यामुळे आराम मिळेल. याशिवाय तूपात 5 ते 10 ग्रॅम झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाका आणि दिवसातून दोन ते तीन वेळा खाल्ल्यास मूळव्याधातून वाहणारे रक्त थांबते. झेंडूच्या पानांचा अर्क देखील या समस्येवर फायदेशीर ठरतो.

– डोळ्यातील लालसरपणा आणि अंधत्व रोखण्यासाठीही झेंडूचे फुल खूप फायदेशीर आहे. झेंडूच्या फुलाचा चहा पिण्यामुळे डोळ्यांमधील सर्व समस्या दूर होतात, तसेच आंधळेपणाचा त्रासही रोखला जातो. डोळ्यांची लालसरपणा दूर करण्यासाठी झेंडूच्या रसाने डोळे धुवावे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Marigold flower benefits from skin problems to serious disease)

हेही वाचा :

Published On - 5:56 pm, Mon, 1 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI