सर्दी आणि फ्लू टाळण्यासाठी हिवाळ्यात लहान मुलांना या तेलांनी करा मालिश
हिवाळा ऋतू आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. त्यामुळे हिवाळ्यात लहान मुलांची काळजी घेणे हे एक मोठे आव्हान बनते. तर आजच्या या लेखात आपण लहान मुलाला सर्दी आणि फ्लूपासून वाचवण्यासाठी कोणत्या तेलाने मालिश करणे फायदेशीर ठरेल ते जाणून घेऊयात.

हिवाळा सुरू झाल्याने वातावरणातील थंड वारे आणि कमी तापमान विशेषतः लहान मुलांसाठी असुरक्षित असते. कारण बदलत्या हवामानात मुलांची विशेषतः नवजात मुलांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती प्रौढांपेक्षा कमकुवत असते. त्यामुळे त्यांना लगेच सर्दी लवकर होते, ज्यामुळे ताप आणि खोकल्याचा धोका वाढतो. हवामानात थोडासा बदल झाला तरी, प्रत्येक आई आपल्या मुलांना उबदार कपडे घालू लागतात आणि शक्य तितक्या सर्व प्रकारे थंडीपासून संरक्षण करू लागतात.
थंडीपासून बचाव करण्यासाठी, केवळ उबदार कपडेच नाही तर तेल मालिश देखील खूप उपयुक्त ठरू शकते. या लेखात, आपण काही तेलांबद्दल जाणून घेऊयात जे तुमच्या मुलाला उबदार ठेवण्यास, त्यांची हाडे मजबूत करण्यास आणि सर्दीपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.
तिळाचे तेल फायदेशीर आहे
आयुर्वेद तज्ञांच्या मते हिवाळ्यात मुलांना सर्दी आणि फ्लूपासून वाचवण्यासाठी तिळाचे तेल सर्वात प्रभावी आहे. तिळाच्या तेलाचा प्रभाव गरम असतो, जो मुलाच्या शरीराला उबदारपणा देतो. त्यात व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पॉवरफूल अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे रक्त परिसंचरण वाढविण्यास आणि स्नायूंना बळकट करण्यास मदत करतात. थंडीच्या दिवसात तुम्ही तुमच्या मुलाच्या तळहातावर, तळव्यावर आणि छातीवर थोडेसे कोमट तिळाचे तेल लावू शकता.
मोहरीच्या तेलाची मालिश
अनेक माता त्यांच्या बाळांना बाजारात उपलब्ध असलेल्या बेबी ऑइलने मालिश करतात. मात्र हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मोहरीचे तेल सर्वोत्तम मानले जाते. मोहरीचे तेल हा एक चांगला पर्याय आहे. ते शरीराला नैसर्गिक उष्णता प्रदान करते, ज्यामुळे सर्दी होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म देखील आहेत, जे सर्दीपासून संरक्षण देतात. सकाळी तुमच्या बाळाला मोहरीच्या तेलाने मालिश करा आणि नंतर त्याला थोडा वेळ उन्हात ठेवा.
नारळ तेल देखील एक चांगला पर्याय आहे
लहान मुलांना थंडीच्या दिवसात नारळाचे तेल फायदेशीर आहे. हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास नारळाचे तेल मदत करते. ते वापरण्यासाठी थोडेसे गरम करा आणि बाळाला मालिश करा. या तेलाच्या वापराने बाळाची त्वचा मऊ करते आणि त्याचे अँटीव्हायरल गुणधर्म संसर्गापासून संरक्षण करतात.
ऑलिव्ह ऑइल देखील फायदेशीर आहे
तज्ञांच्या मते हिवाळ्यात बाळाला मालिश करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल हा एक चांगला पर्याय आहे. ते सौम्य, ॲलर्जीरहित आणि मॉइश्चरायझिंग आहे. या तेलाने मालिश केल्याने थंडीपासून संरक्षण होते आणि त्वचा मऊ होते. हे तेल गरम करण्याची गरज नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
