केशर हळदीच्या फेसमास्कमध्ये मिक्स करा ‘हे’ घटक, मुरूम होतील कमी
केशर, हळदीपासून बनवलेल्या या ओव्हर नाईट मास्क मध्ये फक्त हे एक घटक मिक्स करून त्वचेवर लावल्यास मुरुमांची जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. चला तर मग जाणून घेऊयात या ओव्हर नाईट फेस मास्क बद्दल...

थंडीच्या दिवसात आणि बदलत्या हवामानात चेहऱ्यावर मुरुमांची समस्या अचानक वाढते. कधीकधी एका रात्रीत एक मोठा मुरुम येतो, जो वेदनादायक असतो. त्यामुळे मुरूमांपासुन सुटका मिळवण्यासाठी लोकं विविध क्रीम, जेल आणि महागडे उत्पादने वापरतात. परंतु त्यांचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. त्यामुळे अनेकजण घरगुती उपाय करतात. अशातच तुम्ही सुद्धा घरी उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक घटकांचा वापर करून मास्क बनवू शकता जे रात्रभर मुरुम कमी करू शकतात आणि तुमची त्वचा चमकदार ठेवू शकतात. चला तर मग आजच्या लेखात या ओव्हर नाईटमास्क कसा बनवायचा आणि त्याचे फायदे जाणून घेऊयात. त्वचेवरील पिंपल्सच्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही केशर आणि हळदीच्या फेसमास्कमध्ये एक महत्वाचं घटक मिक्स करायचा आहे तो म्हणजे कोरफड जेल. कोरफड जेल यात मोठी भूमिका बजावतात.
केशर, हळद आणि कोरफड जेल यांचे त्वचेला होणारे फायदे
केशर हा त्वचेला उजळवणारा एक उत्कृष्ट घटक मानला जात आहे. त्वचेतील रक्ताभिसरण वाढवतो आणि डाग हलके करतो.
तर हा ओव्हर नाईट मास्क बनवताना वापरलेल्या हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर असतात, ज्यामुळे मुरुम निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. या दोन्हींच्या मिश्रणामुळे त्वचा स्वच्छ, घट्ट आणि चमकदार होते.
कोरफडीचे जेल केवळ मुरुमांना आराम देत नाही तर जळजळ आणि लालसरपणा देखील कमी करते. तसेच यामुळे त्वचेला थंड होते, छिद्र साफ होतात आणि त्वचेवरील संसर्ग रोखतात. हळद आणि केशर त्वचेला आतून बरे करतात, तर कोरफडीचे जेल चेहऱ्याच्या पृष्ठभागावरील जळजळ त्वरित कमी करते. म्हणून या तिन्ही घटकांना एकत्र करून बनवलेला मास्क मुरुमांवर रात्रीचा परिणाम दाखवू शकतो.
घरी रात्रीच्या वेळी जलद गतीने काम करणारा अँटी-पिंपल मास्क अशा पद्धतीने बनवा
ओव्हर नाईट फेसमास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
4-5 केशराचे धागे
1 चमचा सेंद्रिय किंवा कच्ची हळद
1 टेबलस्पून ताजी कोरफड जेल
1 चमचा गुलाबपाणी
1 चमचा कडुलिंब पावडर (पर्यायी)
ते कसे बनवायचे:
प्रथम केशर गुलाबाच्या पाण्यात 10 मिनिटे भिजवा जेणेकरून त्याचा रंग आणि पोषक घटक बाहेर येतील. नंतर त्यात हळद मिक्स करा. आता यात एक चमचा कोरफड जेल टाका आणि हे मिश्रण चांगले फेटून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. इच्छित असल्यास तुम्ही कडुलिंबाची पावडर देखील घालू शकता. यामुळे बॅक्टेरिया लवकर मरतात.
हा मास्क कसा लावायचा?
झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा सौम्य फेसवॉशने धुवा. जर तुमची त्वचा थोडी ओली असेल तर उत्तम. ही पेस्ट पातळ थरात मुरुमांवर किंवा संपूर्ण चेहऱ्यावर लावा. रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी, थंड पाण्याने तुमचा चेहरा धुवा. तुम्हाला दिसेल की मुरुमांची सूज कमी झाली आहे, लालसरपणा कमी झाला आहे आणि तुमचा चेहरा अधिक स्पष्ट आणि उजळ दिसतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
