AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात एसी वापरा, पण वीज आणि आरोग्याची अशा प्रकारे काळजी घ्या!

पावसाळ्यातील दमट हवा आणि उष्णतेमुळे एसीचा वापर जास्त होतो. पण एसी योग्य प्रकारे न वापरल्यास वीज बिल वाढते आणि आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. चला, तर मग मॉन्सूनमध्ये एसीचा वापर कसा करायचा, ज्यामुळे वीज बिलाची बचत होईल आणि आरोग्यही चांगले राहील, ते जाणून घेऊया.

पावसाळ्यात एसी वापरा, पण वीज आणि आरोग्याची अशा प्रकारे काळजी घ्या!
मॉन्सून एसी टिप्स: मेकॅनिक कधीच सांगणार नाही 'या' महत्त्वाच्या गोष्टीImage Credit source: Freepik
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Aug 03, 2025 | 6:25 PM
Share

सध्या देशभरात मॉन्सूनचा जोर सुरू आहे. पावसाने उष्णतेपासून थोडा दिलासा दिला असला, तरी हवामानातील आर्द्रतेमुळे घरात चिपचिपेपणा आणि घुसमट वाढली आहे. अशा वेळी अनेकजण एसीचा वापर करतात. पण मॉन्सूनमध्ये एसी योग्य प्रकारे न वापरल्यास वीज बिल वाढते आणि आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. याबद्दल मेकॅनिकही तुम्हाला कधी सांगत नाहीत. चला, तर मग मॉन्सूनमध्ये एसी वापरताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, ते जाणून घेऊया.

मॉन्सूनमध्ये एसी वापरताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

मॉन्सूनमध्ये एसीच्या सेटिंग्जमध्ये काही बदल केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.

1. मॉन्सूनमध्ये हवामानातील आर्द्रता जास्त असल्याने, एसीचा ‘ड्राय मोड’ (Dry Mode) वापरणे सर्वात उत्तम आहे. हा मोड खोलीतील अतिरिक्त ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे चिपचिपेपणा कमी होतो आणि थंडी चांगली जाणवते. यामुळे आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होत नाही.

2. पावसाळ्यात हवामान दमट असल्यामुळे एसीच्या फिल्टरमध्ये धूळ आणि घाण लवकर जमा होते. यामुळे हवेची गुणवत्ता खराब होते. म्हणून मॉन्सूनमध्ये एसीचे फिल्टर नियमितपणे स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे.

3. अनेक लोक खोली लवकर थंड होण्यासाठी एसीचे तापमान 20 डिग्रीच्या खाली ठेवतात, पण यामुळे विजेचा वापर जास्त होतो. मॉन्सूनमध्ये 24 ते 26 डिग्री सेल्सियस तापमान पुरेसं असतं आणि यामुळे विजेची बचतही होते.

4. एसीसोबत सीलिंग फॅन चालू ठेवल्यास थंड हवा संपूर्ण खोलीत पसरते. यामुळे एसीला कमी काम करावे लागते आणि विजेची बचत होते.

5. रात्री झोपताना एसीचा टाइमर सेट करा, जेणेकरून खोली थंड झाल्यावर तो आपोआप बंद होईल. यामुळे अनावश्यक वीज वापरली जाणार नाही.

6. एसी चालू असताना खोलीचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा, जेणेकरून थंड हवा बाहेर जाणार नाही आणि एसीला जास्त वेळ चालावा लागणार नाही.

या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही मॉन्सूनमध्येही कमी वीज बिलात चांगल्या आरोग्याचा अनुभव घेऊ शकता.

Follow Us
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल