AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambani : गडगंज संपत्ती… यश… अंबानी यांचा सक्सेस मंत्र दडलाय या 5 पुस्तकात; श्रीमंत होण्यासाठी जाणून घ्या नावं ?

मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांच्या यशामागे काही पुस्तकांचाही हात आहे. कोव्हिड काळात त्यांनी वाचलेली ५ आवडती पुस्तके या लेखात आहेत. ही पुस्तके बदलत्या जगाचे धोरण, भविष्यातील ट्रेंड आणि नवोपक्रम यावर मार्गदर्शन करतात. तुम्हीही ही पुस्तके वाचून मुकेश अंबानींप्रमाणे श्रीमंत आणि यशस्वी होण्याचा मंत्र जाणून घ्या.

Ambani : गडगंज संपत्ती... यश... अंबानी यांचा सक्सेस मंत्र दडलाय या 5 पुस्तकात; श्रीमंत होण्यासाठी जाणून घ्या नावं ?
अंबानी कुटुंब
| Updated on: Jan 09, 2026 | 11:21 AM
Share

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. तसेच जगातील एक महत्त्वाचे उद्योजक आहेत. रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती 87 अब्ज डॉलर पेक्षाही अधिक आहे. असं असलं तरी मुकेश अंबानी अत्यंत साधं आयुष्य जगतात. रोज सकाळी 5 वाजता उठतात. साडे सात वाजेपर्यंत जीममध्ये वर्क आऊट करतात. विशेष म्हणजे त्यांना पुस्तके वाचण्याचीही आवड आहे. आणि याच पुस्तकांमुळे त्यांना आज यश मिळालेलं आहे. तु्हीही ही पुस्तके वाचली तर मनाने श्रीमंत व्हाल.

मुकेश अंबानी नाश्त्यात पपयाचा ज्यूस घेतात. तसेच साऊथ इंडियन डिश खातात. मुकेश अंबानी त्यांच्या कुटुंबाला अत्यंत महत्त्व देतात. कुटुंबासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. सध्या ते त्यांच्या नातवाला पृथ्वीला अधिक वेळ देतात. माझा नातू माझ्यासाठी खूप भाग्यवंत आहे. जेव्हापासून तो जन्माला आला, तेव्हापासून आमची अधिकच भरभराट झाल्याचं अंबानी सांगतात.

मुकेश अंबानी यांच्या यशामागे काही पुस्तकांचाही हात आहे. कोव्हिडच्या काळात त्यांनी अधिकाधिक पुस्तके वाचली. या काळातील त्यांच्या आवडत्या पाच पुस्तकांची त्यांनी माहिती दिली होती. आज पुन्हा एकदा या पुस्तकांची माहिती घेऊया…

टेन लेसन फॉर दे पोस्ट पेंडेमिक वर्ल्ड – प्रसिद्ध पत्रकार फरीद जकारिया यांनी हे पुस्तक लिहिलंय. पूर्वीच्या काळात घडलेल्या आपत्तींचा कोव्हिड 19शी कसा संबंध आहे, याचं विवेचन या पुस्तकात करण्यात आलं आहे. पूर्वीच्या महामाऱ्याही कोरोनासारख्याच होत्या. त्याकाळी या संकटावर कशी मात करण्यात आली होती, याचा आढावा या पुस्तकातून घेतला आहे.

प्रिन्सिपल ऑफ डीलिंग विथ द चेंजिंग वर्ल्ड ऑर्डर – रे डेलियो यांनी हे पुस्तक लिहिलंय. हे पुस्तक अत्यंत रोचक आहे. यात गेल्या 500 वर्षाच्या इतिहासात मोठ्या देशांच्या यश आणि अपयशाबद्दल लिहिलं गेलंय. ज्याचा आपण कधीच विचार केला नाही अशा गोष्टी येणाऱ्या काळात होतील, असं या पुस्तकात म्हटलंय. हे पुस्तक धोरणकर्ते, उद्योजक, अधिकारी आणि तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

द रेजिंग 2020 : कंपनीज, कंट्रीज, पिपल एंड द फाईट फॉर अवर फ्यूचर – एलेक रॉस यांचं हे पुस्तक आहे. दशकांपासून सामाजिक समभ्यता समाजिक अनुबंधाने विणली गेली आहे. पण डीजिटल युगात त्यात मौलिक बदल होत आहे, असं या पुस्तकात दाखवण्यात आलं आहे.

2030 : हाऊ टुडेज ट्रेंड्स विल कोलाइड अँड रिशेप द फ्यूचर ऑफ एव्हरिथिंग – या पुस्तकात 2030च्या जगातील स्थितीच्या बाबत व्यावहारिक अंदाजाचे आकलन करण्यात आलं आहे.

बिग लिटिल ब्रेकथ्रोज : हाऊ स्मॉल, एव्हरिडे, इनोव्हेशन ड्राइव्ह ओव्हरसाईज्ड रिजल्ट्स – अंबानी यांचं हे पाचवं आवडतं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक जोश लिंकर आहेत.

सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल.
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्....
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा.
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल.
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास.
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला.
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात.
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं.
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?.
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला.