Nails Care | नखांना वाढ नाही, अवेळी तुटतायत? कमजोर नखांच्या समस्या दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स येतील कामी!

स्त्रियांची लांब नखे त्यांच्या हातांच्या सौंदर्यात भर घालतात. परंतु, काही लोकांची नखे इतकी कमकुवत असतात की, त्यांची वाढ होताना ती तुटतात.

Nails Care | नखांना वाढ नाही, अवेळी तुटतायत? कमजोर नखांच्या समस्या दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स येतील कामी!
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 7:01 PM

मुंबई : स्त्रियांची लांब नखे त्यांच्या हातांच्या सौंदर्यात भर घालतात. परंतु, काही लोकांची नखे इतकी कमकुवत असतात की, त्यांची वाढ होताना ती तुटतात. त्याच वेळी, काही लोकांची नखे वाढतच नाही, अशा अनेक समस्या उद्भवत असतात. नखांच्या कमकुवतपणामुळे आपल्या हातांच्या सौंदर्यावर तसेच, आरोग्यावरही परिणाम होत असतो. आपल्यालाही नखांसंबंधित अशी समस्या असल्यास, आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत की, त्याने नखांची पुरेशी वाढ होईलच, पण नखांच्या इतर समस्याही दूर होतील (Nail Care Tips for healthy and fast growing nail).

ऑलिव तेल

तीन चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि हे मिश्रण थोडेसे गरम करा. तेल कोमट झाल्यानंतर त्यामध्ये किमान पंधरा मिनिटे नखे बुडवून ठेवा. हा उपाय केल्याने काही दिवसात त्याचा प्रभाव दिसण्यास सुरू होईल. आपण नखांवर बदाम तेलाची मालिश देखील करू शकता.

अंडी पांढरा भाग

जर आपल्याला अंड्यांपासून काही अॅलर्जी नसेल तर, अंड्यातील पांढरा भाग नखांसाठी खूप उपयुक्त ठरेल. या पांढऱ्या भागात दूध घालून व्यवस्थित फेटून घ्या. या मिश्रणामध्ये नखे किमान 10 मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे नखांना योग्य पोषण मिळेल आणि काही दिवसातच नखे मजबूत होऊन, वाढू लागतील.

‘व्हिटामिन सी’ ठरेल लाभदायी

संत्रे किंवा मोसंबीच्या रसात नखं 10 मिनिटे बुडवा, नंतर कोमट पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायझर लावा. संत्री आणि मोसंबीमध्ये व्हिटामिन सी असते, जे नखांसाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे नखे चमकदार होतात आणि वेगाने वाढू लागतात (Nail Care Tips for healthy and fast growing nail).

लसूणची पेस्ट

लसूण पेस्ट बनवा आणि ती नखांवर नियमितपणे लावा. सोबतच लसणीचे सेवन देखील वाढवा. जर दररोज लसून पेस्ट नखांना लावणे जमत नसेल तर, आठवड्यातून किमान दोन दिवस हा उपाय करावे. यामुळे नखांना  मजबुती मिळेल.

मोहरीच्या तेलाचा मसाज

जर तुम्ही नखांची पुरेशी काळजी घेऊ शकत नसाल तर रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाने किमान 15 मिनिटे नखांची मालिश करा. यामुळे आपले नखे चमकदार होतील आणि वेगाने वाढू लागतील.

आहारात बदल

– प्रथिनेची कमतरता दूर होण्यासाठी मोड आलेली मूग डाळ व हरभरा खा.

– शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी डाळिंब, बीट, पालक, केळी, मेथी, अंजीर या घटकांचा आहारात समावेश करा.

– ‘व्हिटामिन बी12’साठी, डॉक्टरांच्या निर्देशानुसार डाएट अथवा सप्लीमेंट घ्या. त्याच वेळी कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी आहारात दूध, दही, चीज या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.

(Nail Care Tips for healthy and fast growing nail)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.