ऐन पंचविशीतच केस पांढरे होतायत? ‘या’ नैसर्गिक रंगांनी मिळेल केसांना पोषण!

धकाधकीचे जीवन आणि बदलती जीवनशैली यामुळे लहान वयातच केस अचानक पांढरे होऊ लागले आहेत.

ऐन पंचविशीतच केस पांढरे होतायत? ‘या’ नैसर्गिक रंगांनी मिळेल केसांना पोषण!
हेअर कलर केल्यानंतर चुकूनही करु नका या चुका

मुंबई : धकाधकीचे जीवन आणि बदलती जीवनशैली यामुळे लहान वयातच केस अचानक पांढरे होऊ लागले आहेत. इतक्या कमी वयात पांढरे झालेले केस पुन्हा काळे करणे शक्य नसते. परंतु, काही नैसर्गिक रंगाच्या मदतीने ते लपवले जाऊ शकतात. बाजारात विकल्या जाणऱ्या रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक रंग केसांसाठी चांगले आहेत. या रंगांमुळे केसांना कुठलीही इजा होत नाही. उलट केसांना पोषण मिळून त्यांची वाढ देखील चांगली आहे (Natural hair Colour for prevent grey hairs problem).

केसांना नैसर्गिक रंग आणि पोषण देण्यासाठी…

– केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी चहा किंवा कॉफीचा वापरा करा. चहाची पाने पाण्यात उकळा आणि थंड झाल्यावर त्याने केसांमध्ये मसाज करा. याने केसांना नैसर्गिक गडद रंग मिळेल. तर, तपकिरी रंगासाठी चहाऐवजी कॉफीचा वापर करा.

– आवळ्यातील बिया काढून, त्याची पेस्ट बनवा. हे पेस्ट केसांमध्ये लावल्याने केस काळे आणि दाट होतात.

– याशिवाय काळे तीळ पाण्याबरोबर दररोज खाल्ल्याने देखील केस नैसर्गिक रित्या काळे होतात.

– तमालपत्र आणि मेंदी दोन कप पाण्यात उकळवा. थंड झाल्यावर हे मिश्रण केसांना लावा आणि 15 मिनिटे तसेच राहून द्या. नंतर डोके धुवा. ही पेस्ट आपल्या केसांना एक नैसर्गिक रंग देईल. आठवड्यातून एकदा हा उपाय करा (Natural hair Colour for prevent grey hairs problem).

– लालमाठाची पाने केसांना नैसर्गिक रंग देतात. त्यांना बारीक करून, त्याची पेस्ट केसांना लावा. यातील पोषक घटकांमुळे केसांची वाढ सुधारते.

– केसांची गळती थांबवण्यासाठी, तसे केसांच्या इतर समस्यांसाठी कांद्याची पेस्ट करून केसांना लावा.

– नारळ तेल आणि लिंबू एकत्र मिसळून केसांमध्ये लावल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत. या मिश्रणामध्ये नारळ तेलाचे दोन भाग आणि लिंबाचा रस एक भाग घालावा.

– कढीपत्ता नारळाच्या तेलात घाला आणि तो तडतडेपर्यंत गरम होऊ द्या. नंतर हे तेल गाळून त्याने केसांची मालिश करा. सुमारे 30-45 मिनिटांनंतर केस धुवा. आठवड्यातून दोनदा या प्रक्रियेचे अनुसरण करा. यामुळे केसांच्या मुळांची ताकद वाढते आणि केसांना आवश्यक पोषण मिळते.

(टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही उपचारांपूर्वी सौंदर्यतज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

(Natural hair Colour for prevent grey hairs problem)

हेही वाचा : 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI