प्रजासत्ताक दिनानिमित्त बनवा तिरंग्याचे ‘हे’ स्पेशल पदार्थ, मुलांच्या मनात जागृत होईल देशाबद्दलचं प्रेम

प्रजासत्ताक दिन हा फक्त देशभक्तीचा सण नाही तर कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी तसेच काहीतरी स्वादिष्ट खाण्याची देखील संधी आहे. तुम्हाला तिरंग्यापासून प्रेरणा घेऊन काही बनवायचे असेल तर जाणून घेऊ प्रजासत्ताक दिनानिमित्त काही खास पदार्थ

प्रजासत्ताक दिनानिमित्त बनवा तिरंग्याचे 'हे' स्पेशल पदार्थ, मुलांच्या मनात जागृत होईल देशाबद्दलचं प्रेम
Tricolour DishesImage Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 23, 2025 | 11:13 PM

दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा केला जातो. हा दिवस आपल्या संविधानाच्या अंमलबजावणीचे प्रतीक आहे आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची तसेच लोकशाहीच्या मूल्यांची आठवण करून देणारा आहे. प्रत्येक भारतीय हा खास दिवस आपापल्या पद्धतीने साजरा करतो. शाळेमध्ये परेड, ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात. तर घराघरातही हा दिवस देशभक्तीच्या भावनेने खास बनवण्यासाठी विशेष तयारी केली जाते.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बहुतेक लोकांना त्यांच्या कुटुंबासह आणि मित्रांसह घरी सुट्टीचा आनंद घ्यायला आवडतो. यानिमित्ताने चविष्ट पदार्थ बनवून दिवस आणखीन स्मरणीय बनवता येऊ शकतो. तुम्हालाही या खास दिवशी घरी काहीतरी चविष्ट आणि वेगळे बनवायचे असेल तर जाणून घ्या काही सोप्या आणि चविष्ट पदार्थांबद्दल जे तुम्ही या दिवशी बनवू शकता.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बनवा हे पदार्थ

तिरंगा सँडविच

देशभक्तीच्या रंगांनी प्रेरित असलेले हे सँडविच लहान मुले आणि प्रौढ दोघांनाही आवडेल. यासाठी ब्रेड स्लाईस, पुदिनाची चटणी, गाजर पेस्ट, चीज आणि बटर आवश्यक आहे. हे सर्व पदार्थ तिरंग्याच्या रंगाप्रमाणे सजवा आणि चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.

पनीर टिक्का

पनीर टिक्का हा प्रत्येक भारतीयांचा आवडता पदार्थ आहे. जो तुम्ही घरी सहज बनवू शकतात. यासाठी तुम्हाला चीज, दही, मसाले आणि शिमला मिरची लागेल. सर्वप्रथम पनीरचे चौकोनी तुकडे करून त्यात दही घालून मसाले मिसळून पनिरला व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर ते तव्यावर भाजून घ्या आणि तंदुरी फ्लेवर देण्यासाठी मधोमध एक वाटी ठेवून त्यात कोळसा साठवून त्याला धूर द्या.

तिरंगा इडली

या दक्षिण भारतीय पदार्थासोबत तिरंग्याचे सौंदर्य जोडा. इडली बनवण्यासाठी पालक प्युरी आणि गाजर प्युरी पिठात मिसळा आणि नंतर वाफवून घ्या. नारळाची चटणी आणि सांबर बरोबर हे सर्व्ह करा.

तिरंगा पुलाव

रंगीबेरंगी आणि चवदार पुलाव तुमच्या दुपारच्या जेवणाला खास बनवू शकेल. यासाठी तुम्हाला बासमती तांदूळ, पालक, गाजर, आणि मसाल्यांची गरज आहे. सामान्य पुलाव प्रमाणेच हा पुलाव बनवा फक्त त्याची भाजी तिरंगा रंगाची तयार करा. गाजर, पालक आणि पनीर यासारखे पदार्थांचा समावेश करा. हा पुलाव दही किंवा रायत्या सोबत सर्व्ह करा.

खस्ता कचोरी

कचोरी ही पूर्ण कुटुंबासाठी योग्य असा नाश्ता ठरेल. यासाठी तुम्हाला नेहमीच्या पद्धतीने कचोरी तयार करायची आहे. ज्यामध्ये लाल रंगासाठी चिंचेची चटणी, पांढऱ्या रंगासाठी दही आणि हिरव्या रंगासाठी पुदिन्याची चटणी घालून सर्व्ह करा.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.