‘हे’ आहे जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव; जिथे सिगारेट अन् दारूला आहे बंदी, तुम्हालाही भेट द्यायची आहे का?
असे एक गाव जे जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव म्हणून ओळखले जाते. तिथे काही सिगारेट, दारूला सक्त मनाई आहे. तसेच या गावाची परंपराही अगदी वेगळी आहे. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावातील पर्यटन, हिरवळ , शांत वातावरण. त्यासाठी पर्यटक आवर्जून या गावाला भेट देतात. जाणून घेऊयात ते गाव कोणतं? त्या गावाला कशी भेट द्यायची? असे एक गाव जे जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव म्हणून ओळखले जाते. तिथे काही सिगारेट, दारूला सक्त मनाई आहे. तसेच या गावाची परंपराही अगदी वेगळी आहे. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावातील पर्यटन, हिरवळ , शांत वातावरण. त्यासाठी पर्यटक आवर्जून या गावाला भेट देतात. जाणून घेऊयात ते गाव कोणतं? त्या गावाला कशी भेट द्यायची?

रोज्या धावपळीच्या जीवनात थोडासा वेळ काढून फिरायला जाणे हे प्रत्येकासाठी महत्वाचे असते. प्रत्येकजण फिरायला जाताना सुरक्षित, स्वच्छ, शांत असं ठिकाण शोधतो. जेणेकरून आपल्याला धावपळीपासून एकांत मिळावा. तुम्हाला देखील अशाच ठिकाणी जायचं असेल तर असं एक गाव आहे जे जगातील स्वच्छ हिंदूंचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावाला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. या गावाची तशी बरीच खासियत आहेत ज्याच्याबद्दल जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
जगातील हिंदू लोकसंख्येच्या अंदाजे 94 टक्के लोक भारतात राहतात तसेच दुसऱ्या अनेक देशांमध्येही हिंदू राहतात. पण या गावात सर्वात जास्त हिंदू राहतात. चला तर मग हे गाव कुठे आहे आणि तुम्हाला जर तिथे जायचं असले तर तिथे कसं जायचं याबद्दल जाणून घेऊयात.
जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव
तर जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव हे इंडोनेशियामध्ये आहे. इंडोनेशिया हा मुस्लिम देश असूनही, इंडोनेशियामध्ये जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव आहे. इंडोनेशियातील बाली बेटावर वसलेलं पेंगलीपुरण गाव. हे गाव जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव म्हणून ओळखलं जातं. हे गाव जगातील तीन सर्वात स्वच्छ गावांपैकी एक आहे. पेंगलीपुरण गाव बालीच्या बांगली जिल्ह्यात आहे. डोंगरांमध्ये वसलेले हे गाव त्याच्या स्वच्छ रस्त्यांसाठी, सुंदर बागा, हिरवळीसाठी तसेच त्याच्या पारंपारिक घरांसाठी प्रसिद्ध आहे.
गावात या गोष्टींना मनाई
पेंगलीपुराण गावाचे सौंदर्य आणि स्वच्छता ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. येथे कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे आणि फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच धूम्रपान करण्यास परवानगी आहे. मद्यपान करण्यास देखील सक्त मनाई आहे. या गावातील जवळजवळ सर्व घरे पारंपारिक बांबू वापरून बांधली जातात. या गावातील महिला गावाच्या स्वच्छतेत देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. दर महिन्याला, महिला गावातील सर्व कचरा गोळा करतात. त्यानंतर सेंद्रिय कचरा कंपोस्टमध्ये रूपांतरित केला जातो, तर प्लास्टिक आणि इतर जैवविघटनशील कचरा पुनर्वापरासाठी पाठवला जातो.
पेंगलीपुराणची संपूर्ण लोकसंख्या हिंदू
इंडोनेशियामध्ये असलं तरी देखील पेंगलीपुराण हे गाव 100% हिंदू आहे. शिवाय, या गावात अनेक मंदिर देखील आहे. प्रत्येक घरात एक वेगळे कुटुंब मंदिर देखील आहे. हे गाव अंदाजे 700 वर्षे जुने आहे. ते जुने असूनही, तिथे अद्यापपर्यंत एकही गुन्हा नोंदवला गेलेला नाही. या गावातील घरे देखील एका परिपूर्ण रांगेत बांधलेली आहेत. या गावात कोणत्याही प्रकारच्या वाहनांना देखील परवानगी नाही.
पेंगलीपुराणला भेट द्यायची असल्यास कसं जायचं?
पेंगलीपुरण गाव बालीच्या बांगली जिल्ह्यात आहे, जे देनपासारपासून अंदाजे 45 किलोमीटर आणि बांगली शहरापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. गावात पोहोचण्याचा सर्वात सोयीस्कर मार्ग म्हणजे खाजगी कार. पर्यायी म्हणून, तुम्ही ग्रॅब आणि गौजेक सारख्या राइड-शेअरिंग अॅप्सचा वापर करू शकता. हे गाव वर्षभर पर्यटकांसाठी सकाळी 8.15 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत खुले असते. या गावाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ एप्रिल ते ऑक्टोबर आहे. गावात वेगवेगळ्या दरांसह होमस्टे देखील उपलब्ध आहेत. होमस्टेमध्ये घरी बनवलेले जेवण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.
त्यामुळे शांत, स्वच्छ हिरवळीने नटलेल्या अशा ठिकाणी जायचं असेल, तसेच एक वेगळी हिंदू संस्कृती अनुभवायची असेल तर हे गाव नक्कीच फिरण्यासाठी, भेट देण्यासाठी सगळ्यात सुंदर पर्याय आहे.
