उन्हाळ्यात केसांना तेल लावण्याची जाणून घ्या ‘या’ योग्य पद्धती, केस गळतीपासून होईल सुटका
केसांना तेल लावणे आवश्यक आहे. कारण तेल लावल्याने केसांना योग्य पोषण मिळते. तसेच केस गुळगुळीत होतात, वाढण्यास मदत होते आणि केस गळती रोखण्यासाठी देखील फायदेशीर आहे. पण काही लोकांना असे वाटते की उन्हाळ्यात तेल लावणे योग्य नाही. उलट उन्हाळ्यात तेल लावण्याची योग्य पद्धत अवलंबून तुम्ही तुमचे केस निरोगी बनवू शकता. उन्हाळ्यात तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती ते जाणून घेऊया?

उन्हाळा ऋतू सुरू होताच या दिवसांमध्ये कडक उन्हाचा आणि उष्ण वाऱ्याचा परिणाम केवळ आपल्या शरीरावरच नाही तर केसांवरही होऊ लागतो. कारण जेव्हा आपण कामानिमित्त बाहेर पडतो तेव्हा कडक उन्ह, घाम, धूळ आणि प्रदूषण, यामुळे आपल्या केसांची मुळे कमकुवत होतात, ज्यामुळे केस गळतात आणि कोरडेपणा वाढतो. तसेच कोंडा होतो यासारख्या समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत केसांची काळजी घेण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी तसेच नैसर्गिक मार्ग म्हणजेच केसांना तेल लावणे. उन्हाळ्यात केसांना तेल लावल्याने केस अधिक चिकट होतात किंवा त्यामुळे टाळूला जास्त घाम येतो असे अनेक लोकं मानतात, परंतु सत्य हे आहे की जर योग्य पद्धतीने आणि योग्य पद्धतीचे तेल वापरले तर उन्हाळ्यात केसांना तेल लावणे तुमच्या केसांसाठी वरदान ठरू शकते.
अशातच असे काही तेल आहेत जे केसांना पोषण तर देताच पण त्यांना हायड्रेट देखील करतात. ज्यामुळे आपले केस मजबूत आणि चमकदार बनतात. प्रश्न असा आहे की उन्हाळ्यात केसांना तेल कसे लावायचे जेणेकरून आपल्याला त्याचा पूर्ण फायदा मिळेल आणि केसांना कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही? तर या लेखात आपण जाणून घेऊया की उन्हाळ्यात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती?
उन्हाळ्यात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत
योग्य तेल निवडा
उन्हाळ्यात हलके आणि टाळूमध्ये लवकर शोषले जाणारे तेल वापरावे. तसेच केसांना घट्ट तेल लावल्याने वातावरणातील उष्णतेमुळे केसांमध्ये चिकटपणा आणि घाम येऊ शकतो. जर तुम्ही उन्हाळ्यात केसांना तेल लावत असाल तर तुम्ही नारळाचे तेल वापरावे. ते स्कॅल्पला थंड करते आणि पोषण देते. याशिवाय तुम्ही आवळा तेल देखील वापरू शकता, ते केसांना मजबूत आणि जाड बनवते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ब्राम्ही, भृंगराज, जोजोबा किंवा बदाम तेल देखील वापरू शकता.
केस धुण्याच्या आदल्या रात्री किंवा 2-3 तास आधी केसांना तेल लावा
उन्हाळ्यात जास्तवेळ तेल लावणे गरजेचे नाही. तुम्हाला हवे असल्यास केसा धुण्याच्या आधी 2 ते 3 तास आधी तेल लावू शकता किंवा रात्री हलके तेल लावून झोपू शकता आणि सकाळी केस धुवू शकता. हे स्कॅल्पला चांगले पोषण देते आणि केसांना गुळगुळीत देखील करते.
हलक्या हातांनी मालिश करा
केसांना तेल लावताना खूप जोरात चोळू नका. बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने गोलाकार फिरवत डोक्याला मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. नखांनी ओरखडे पडणार नाहीत याची काळजी घ्या.
जास्त तेल लावू नका
उन्हाळ्यात जास्त तेल लावणे योग्य नाही. यामुळे, स्कॅल्पला जास्त घाम येईल आणि धूळ आणि घाण त्यावर चिकटू शकते, ज्यामुळे केसांनाच नुकसान होऊ शकते. म्हणून फक्त थोडेसे तेल लावा, जे स्कॅल्प आणि केसांवर चांगले पसरेल.
कोमट तेलाने मालिश करा
केसांना थोडे कोमट तेल लावल्याने केसांच्या मुळांपर्यंत लवकर पोहोचते आणि आराम देखील मिळतो. तेल थोडे गरम करा. इतके की बोटांनी स्पर्श केल्यावर ते आरामदायी वाटेल आणि गरम लागणार नाही.
आठवड्यातून फक्त 1-2 वेळा तेल लावा
उन्हाळ्यात दररोज किंवा वारंवार केसांना तेल लावण्याची गरज नाही. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा तेल लावणे पुरेसे आहे. जास्त वेळा तेल लावल्याने स्कॅल्पवर घाण जमा होऊ शकते आणि स्कॅल्प तेलकट होऊ शकते. लक्षात ठेवा की खराब झालेल्या केसांना तेल लावू नका, तेल लावल्यानंतर उन्हात बाहेर जाऊ नका आणि तेल लावल्यानंतर लगेच केस धुवू नका.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)