भाजलेले की भिजवलेले चण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर? जाणून घ्या चणे खाण्याची योग्य पद्धत
चणे तुमच्या शरीरात औषधासारखे काम करतात. आपल्या आहारात चण्याचे समावेश केल्याने आपण तंदुरस्त राहतो. त्याचबरोबर अनेकांना प्रश्न पडतो की हिवाळ्यात भिजवलेले चणे खावे की भाजलेले जेणेकरून तेआपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. चला तर मग आजच्या लेखात याबद्दल जाणून घेऊयात.

निरोगी राहण्यासाठी आपण प्रत्येकजण आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करत असतो. आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात चणे असतात. तर चण्यांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. कारण चणे हे प्रथिने, लोह, कॅल्शियम, फोलेट आणि पोटॅशियमने समृद्ध आहे. तर हे चणे आपण दोन प्रकारे आपल्या आहारात सेवन करत असतो, एक चण्याची भाजी आणि दुसरं म्हणजे भाजलेले चण्याचे सेवन केले जाते. आता, प्रश्न असा आहे की, हिवाळ्यात भिजवलेले चणे खाणे योग्य की भाजलेले चणे सेवन करणे फायदेशीर ठरणार आहे. ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
चणे शरीराला मजबूत बनवते
चणे शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यास मदत करतात. कारण लोह हे आपल्या शरीराला मजबूत करते. लोह हाडांसाठी वरदान आहे. तसेच यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय चण्यांचे सेवन केल्याने आपली भूक नियंत्रित होते ज्यामूळे वजन कमी करण्यात देखील खूप प्रभावी आहे. काही लोकं भाजलेले चणे खातात.
हिवाळ्यात भिजवलेले किंवा भाजलेले चणे खावे का?
चणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाणे खूप फायदेशीर आहे. यामुळे हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले चणे त्वचेची चमक सुधारण्यास देखील मदत करतात आणि त्यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असते.
तज्ञांच्या मते हिवाळ्यात तुम्ही भिजवलेले चणे खाऊ शकता. एखाद्या व्यक्तीने दररोज 50 ग्रॅम चणे खावे. भिजवलेल्या चण्यांमध्ये लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही गूळ मिक्स करून खाऊ शकता. हिवाळ्यात भाजलेले चणे देखील खाऊ शकता.
या लोकांनी चणे खाऊ नयेत
जर एखाद्याला अतिसार झाला असेल तर तो बरा होईपर्यंत त्याने चणे खाणे टाळावे. अतिसारामुळे गॅस, पोटफुगी, पेटके, मळमळ आणि पोटाशी संबंधित इतर समस्या देखील उद्भवू शकतात.
भाजलेले चणे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो?
भाजलेले चणे फायबर, फॅट आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, ज्यामुळे ते हृदयासाठी निरोगी ठरते. तसेच भाजलेल्या चण्यांचे सेवन केल्याने खराब फॅट कमी होण्यास आणि ब्लॉकेजेस टाळण्यास मदत होते. शिवाय रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी देखील भाजलेले चणे प्रभावी मानले जातात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
