AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांशी संवाद साधताना अडचणी येतात, मग 25 सेकंदाचा मंत्रा नक्की वाचा

शाळेचा अभ्यास, गृहपाठ आणि परीक्षा यामुळे अनेकदा मुलांवर ताण येतो. पण बऱ्याच वेळा ते हे सर्व गोष्टी पालकांपासून लपवतात.अशा वेळी पालकांनी अवघ्या 25 सेकंदांचा ‘पॅरेंटिंग मंत्रा’ वापरला, तर मुलं मन मोकळं करतात आणि नातं अधिक घट्ट होतं. पण हा मंत्र कसा आणि कधी वापरावा? ते जाणून घ्या सविस्तरपणे.

मुलांशी संवाद साधताना अडचणी येतात, मग 25 सेकंदाचा मंत्रा नक्की वाचा
parents talk
| Edited By: | Updated on: Jul 15, 2025 | 4:36 PM
Share

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पालक आणि मुलांमध्ये संवादाची जागा झपाट्याने कमी होत चालली आहे. दिवस भर कामाचा व्याप, मोबाइल-टीव्हीचा वाढता वापर, शाळा-क्लासेसचा ताण, आणि तांत्रिक जीवनशैलीमुळे अनेकदा आई-वडिलांना आपलीच मुलं ‘दूर’ वाटायला लागतात. अनेक वेळा पालकांच्या मनात प्रश्न असतो “माझं मूल काहीतरी लपवतंय का?”, “तो तणावात आहे का?”, “अभ्यासात मन लागत नाहीये का?” पण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी गरज असते एक साध्या, समजूतदार संवादाची. त्यासाठीच उपयोगी पडतो ‘25 सेकंद पॅरेंटिंग मंत्रा’

काय आहे हा 25 सेकंद मंत्रा?

प्रसिद्ध बाल मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, मुलांशी मोठमोठ्या चर्चा करण्याऐवजी, दररोज किंवा आठवड्यातून काही वेळ फक्त 1 ते 3 मिनिटं संवाद साधा तोही हलक्याफुलक्या भाषेत आणि एका विशिष्ट मुद्द्यावर. तुम्ही त्यांना काही शिकवण्याच्या उद्देशाने नव्हे, तर समजून घेण्याच्या दृष्टीने ऐका. या पद्धतीने मुलं आपल्या मनातल्या गोष्टी हळूहळू व्यक्त करायला लागतात. ही पद्धत विशेषतः मुलांमध्ये अधिक प्रभाव टाकते कारण त्यांना काहीतरी “बोझ” वाटत नाही. ते सुरक्षित वाटू लागतात, आणि संवादाचं दार उघडतं.

लांबचं बोलणं का होतं अयशस्वी?

मुलांचं लक्ष लवकर भटकतं, विशेषतः जेव्हा त्यांच्या समोर लांब, गंभीर किंवा शिकवण्याचा सूर असलेला संवाद येतो. अशा वेळेस ते किंवा गप्प बसतात, किंवा संवाद टाळतात. याउलट, जर संवाद हलकाफुलका, प्रश्नात्मक आणि मैत्रीपूर्ण असेल तर मुलं सहज संवाद साधतात आणि बोझ वाटत नाही.

कसा कराल सुरुवात?

विचार : संवादाची सुरुवात “मी तुला समजून घ्यायला इच्छुक आहे” या भावनेने करा. सल्ला देण्यासाठी नाही, तर ऐकण्यासाठी तयार आहात, हे समोरच्याला जाणवू द्या. मूल काय म्हणतंय, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, हालचाली हे बारकाईने पहा.

आवाज : तुमचं बोलणं कोमल, मैत्रीपूर्ण आणि समजूतदार असावं. उदाहरणार्थ, “आज काय विशेष घडलं?” किंवा “तू इतका शांत का आहेस?” अशा सहज प्रश्नांमधून संवाद सुरू करता येतो.

वेळ : सर्वात योग्य वेळ असते, जेव्हा मूल रिलॅक्स असतं उदा. झोपण्यापूर्वी, जेवताना, किंवा गाडीतून जाताना. लक्षात ठेवा, थेट डोळ्यांत बघत संवाद साधणं कधी-कधी मुलांना अस्वस्थ करतं, त्यामुळे सहज, बाजूला बसून संवाद जास्त परिणामकारक ठरतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.