Skin Care | गर्भावस्थेदरम्यान ‘हे’ नैसर्गिक फेशियल मास्क वाढवतील चेहऱ्याचे सौंदर्य! वाचा याचे फायदे…

गर्भातील बाळाला त्रास किंवा कुठलीही इजा होऊ नये म्हणून गर्भवती स्त्रियांना बाजारात मिळणारी सौंदर्य उत्पादने लावण्यास डॉक्टरांनी मनाई केलेली असते.

Skin Care | गर्भावस्थेदरम्यान 'हे' नैसर्गिक फेशियल मास्क वाढवतील चेहऱ्याचे सौंदर्य! वाचा याचे फायदे...
गरोदरपणात स्त्रीच्या शरीरातील बदलांचा परिणाम तिच्या चेहऱ्यावरही बर्‍याचदा दिसून येतो.

मुंबई : गरोदरपणात स्त्रीच्या शरीरातील बदलांचा परिणाम तिच्या चेहऱ्यावरही बर्‍याचदा दिसून येतो. अशा परिस्थितीत काही महिलांना चेहऱ्याच्या त्वचेवर काळेपणा, मुरुम किंवा पिग्मेंटेशन येते. त्याच वेळी, गर्भातील बाळाला त्रास किंवा कुठलीही इजा होऊ नये म्हणून गर्भवती स्त्रियांना बाजारात मिळणारी सौंदर्य उत्पादने लावण्यास डॉक्टरांनी मनाई केलेली असते. अशा परिस्थितीत स्त्रियांच्या या सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी काही नैसर्गिक फेशियल मास्क वापरले जाऊ शकतात. याने चेहऱ्याच्या समस्या दूर होती आणि कोणताही अपाय देखील होणार नाही (Skin care tips for glowing skin during pregnancy).

जर आपली त्वचा तेलकट असेल…

जर आपली त्वचा तेलकट असेल, तर केळीचा फेस मास्क खूप चांगला पर्याय ठरेल. यासाठी एक केळे, एक छोटा चमचा मध, एक चमचा लिंबाचा रस एकत्र मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. काही काळासाठी हा मास्क कोरडा होऊ द्या. यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

काकडी आणि टरबूजाचा फेशियल मास्क

काकडी आणि टरबूज चेहर्‍याची चमक वाढवण्यासाठी अतिशय चांगले मानले जातात. हा फ्रुट फेस पॅक बनवण्यासाठी, दोन चमचे काकडी रस, दोन चमचे टरबूज रस, एक चमचा दही, एक चमचा दूध पावडर हे साहित्य लागेल. या सर्व गोष्टी एका बाऊलमध्ये चांगल्या प्रकारे मिसळा आणि चेहरा व मानेवर लावा. सुमारे 15 मिनिटे चेहऱ्यावर हा मास्क राहू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. टरबूज चेहर्‍यावरील डाग दूर करण्यात मदत करते, तसेच एक चांगले टोनर म्हणून देखील कार्य करते. काकडी त्वचेचा काळपटपणा दूर करते आणि चेहर्‍यावरील लालसरपणा आणि सूज कमी करण्यास मदत करते. त्याच वेळी, दह्यामुळे त्वचा मऊ आणि घट्ट होते (Skin care tips for glowing skin during pregnancy).

बदाम मध फेशियल मास्क

जर आपल्याला फळांची अॅलर्जी असेल, तर बदाम आणि मध यांचा पॅक आपल्या चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. हे फेस पॅक तयार करण्यासाठी रात्री चार ते पाच बदाम भिजवा. त्यांना सकाळी बारीक वाटून त्यात मध घाला. नंतर हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि तो व्यवस्थित कोरडे होईपर्यंत किमान 15 मिनिटे तसाच राहू द्या. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर, थोड्या बदाम तेलाने चेहऱ्यावर हलक्या हातांनी मसाज करा. हिवाळ्यात हा फेशियल मास्क लावल्याने चेहरा कोरडा पडण्याची समस्या दूर होईल.

हनी मास्क

जर चेहऱ्याची त्वचा निर्जीव दिसत असेल, तर आपण आपल्या चेहऱ्यावर मध लावू शकता. चेहऱ्यावर लावलेला मध कोरडा झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. दररोज हा फेशियल मास्क लावल्याने चेहऱ्यावर चमक आणि घट्टपणा येतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Skin care tips for glowing skin during pregnancy)

हेही वाचा :

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI