मुरुमांपासून मुक्तता हवीय?, 4 आयुर्वेदिक फेस पॅक वापरून पाहा आणि मिळवा चमदार तेजस्वी त्वचा
मुरुम आणि डाग-मुक्त त्वचेसाठी तुम्ही घरच्या घरी सर्वात प्रभावी आयुर्वेदिक अँटी एक्ने फेस पॅक देखील बनवू शकता. कोणत्या घटकांचा वापर करून तुम्ही हे फेस पॅक बनवू शकता, चला जाणून घेऊया.

मुंबई : त्वचेवर पुरळ येणे ही एक सामान्य समस्या आहे. असे होण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की बिघडलेली जीवनशैली, तणाव आणि आहार. मुरुमांच्या सामान्य डागांपासून मुक्त मिळण्यासाठी तुम्ही प्रभावी आयुर्वेदिक अँटी एक्ने फेस पॅक घरी देखील बनवू शकता. चला जाणून घेऊया तुम्ही घरच्या घरी कसा तयार कराल आयुर्वेदिक अँटी एक्ने फेस पॅक
तुळस आणि कोरफड
तुळशीची पाने घ्या. ते पूर्णपणे धुवा आणि नंतर त्याची पेस्ट बनवा. तुळशीच्या पानांमध्ये दोन चमचे कोरफडीचे जेल मिसळा आणि एकत्र करा. ते संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर ताज्या पाण्याने धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा या पॅकचा वापर करा.
कडुनिंब आयुर्वेदिक अँटी एक्ने फेस पॅक
कडुलिंबाची पाने घ्या. ती चांगली धुवा. त्यांना त्याची पेस्ट चेहऱ्याच्या मुरुमग्रस्त भागांवर लावा. ते कोरडे होईपर्यंत तसेच राहू द्या. आता तुमची बोटे ओली करा आणि स्वच्छ धुण्यापूर्वी त्वचा हळूवारपणे स्वच्छ करा. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. आपण ते दर 2-3 दिवसांनी वापरू शकता.
हळद आणि कडुलिंबाचा फेस पॅक
या फेसपॅकसाठी तुम्हाला कडुलिंबाची पावडर वापरावी लागेल. मूठभर कडुलिंबाची कोरडी पाने वाटून त्याची पावडर बनवा. तुम्ही दुकानात मिळणारी कडुलिंबाची पावडर देखील वापरू शकता. एका भांड्यात एक टेबलस्पून कडुलिंब पावडर घ्या आणि त्यात चिमूटभर हळद घाला. एकत्र मिक्स करा आणि नंतर त्यात पुरेसे गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करा. ते संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे तसेच राहू द्या.
गुलाब पाणी आणि मुलतानी माती
एका भांड्यात 1-2 चमचे मुलतानी माती घ्या आणि त्यात पुरेसे गुलाबजल टाकून पेस्ट तयार करा. पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या. ते अर्धे कोरडे झाल्यानंतर चेहरा स्क्रब करणे सुरू करा. काही मिनिटांनंतर, पाण्याने स्वच्छ धुवा. आपण आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा वापरू शकता.
हेही वाचा :
Weight Loss | दिवाळीच्या फराळाने वजन वाढलं? डिटॉक्सिफिकेशनच्या विचारत आहात?, जाणून घ्या सोपे मार्ग…